अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लवकरच ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री आता आपल्याला 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत दिसून येणार आहे. 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री होणार आहे 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत अपूर्वा नेमळेकर राणी चेन्नमाच्या भूमिकेत दिसणार आहे. या ऐतिहासिक लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. हातात तलवार घेऊन ती अश्वारूढ आहे. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या भूमिकेचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून शेवंताच्या रूपात घराघरात पोहोचली आहे. वादग्रस्त कारणांमुळे अपूर्वाने ही मालिका सोडली. त्यांनतर तिचे चाहते फारच निराश झाले होते. परंतु आता अपूर्वा पुन्हा एकदा इतक्या दमदार भूमिकेत पडद्यावर वापसी करत असल्याने चाहते फारच आनंदी आहेत.