जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / परिणीती चोप्राचा topless अवतार; PHOTO सोशल मीडियावर होतोय viral

परिणीती चोप्राचा topless अवतार; PHOTO सोशल मीडियावर होतोय viral

परिणीती चोप्राचा topless अवतार; PHOTO सोशल मीडियावर होतोय viral

यावेळी ती चक्क एका टॉपलेस फोटोमुळं (Parineeti Chopra topless photoshoot) चर्चेत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 1 एप्रिल**:** परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ऑनलाईन पोस्ट, फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी ती चक्क एका टॉपलेस फोटोमुळं (Parineeti Chopra topless photoshoot) चर्चेत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड फोटोग्राफर डबू रत्नानी (Dabboo Ratnani) यानं परिणीतीचं हे टॉपलेस फोटोशूट केलं आहे. तो दरवर्षी आपलं एक सेलिब्रिटी कॅलेंडर प्रकाशित करतो. या कॅलेंडरमध्ये बॉलिवूडमधील नामांकित कलाकारांचे थक्क करणारे फोटो असतात. गेल्या वर्षी त्यानं आपल्या कॅलेंडरसाठी अभिनेत्री कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट केलं होतं. यावेळी त्यानं अभिनेत्री परिणीतीची निवड केली आहे. परिणीती या फोटोमध्ये एका पिवळ्या रंगाच्या लहानशा गाडीत बसलेली दिसत आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अवश्य पाहा - Sana Khan पितेय सोन्याची कॉफी; किंमत पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

जाहिरात

अवश्य पाहा - अनुष्काची भविष्यवाणी ठरली खोटी; लग्नापूर्वीचा Video होतोय व्हायरल परिणीतीचा सायना हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात तिनं सायनाची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी तिनं प्रचंड मेहनत केली होती. सायनामध्ये तिनं केलेल्या अभिनयाची सर्वत्र स्तुती होत आहे. परिणीती गेली अनेक वर्ष एका सुपरहिट भूमिकेच्या शोधात होती. या भूमिकेतून तिचा तो शोध अखेर पुर्ण झाला असंही काही समिक्षकांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात