मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Saina Release Date: भारताची अव्वल बॅडमिंटनपटू लवकरच दिसणार चित्रपटगृहात

Saina Release Date: भारताची अव्वल बॅडमिंटनपटू लवकरच दिसणार चित्रपटगृहात

Saina Release Date: बॅडमिंटन स्टार खेळाडू (Badminton Player ) सायना नेहवालचा (Saina Nehwal) बायोपिक या महिन्यात प्रदर्शित होत आहे. सायना नेहवालची भूमिका साकारणारी परिणीती चोप्राने स्वत: याबद्दल माहिती दिली आहे.

मुंबई, 2 मार्च: भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा (Saina Nehwal) जीवनपट लवकरच प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहे. तिच्यावर आधारित बायोपिकची (Biopic on Saina Nehwal) घोषणा झालेली असून आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची प्रतीक्षा शेवटी संपुष्टात आलेली आहे. सायनाची भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) स्वत: ही माहिती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. परिणीती चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं असून 26 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे.

परिणीतीने सायना नेहवालच्या बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतरीत्या घोषित केली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना परिणीतीने '26 मार्च रोजी थिएटरमध्ये सायना…’ असं कॅप्शन लिहिलं आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये एक हात दिसत आहे आणि त्यावर शटलकॉकच्या आकारात ‘सायना’ असं लिहिलेलं दिसतंय. पोस्टरमध्ये दिसलेल्या हातावर तिरंगा बँड घातला गेला आहे. त्याचबरोबर ‘मार दूंगी’ असं कॅप्शन लिहिलेलं दिसतंय.

(हे वाचा -   सलमान खानची तिसरी आई; सोशल मीडियावर व्हायरल होतोय PHOTO)

या अधिकृत घोषणेनंतर आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. परिणीती चोप्राने सायना नेहवालच्या या बायोपिकसाठी खूप परिश्रम घेतले आहेत. चित्रपटाच्या पात्राला न्याय मिळवून देण्यासाठी परिणीतीने बॅटमिंटन कोर्टातही खूप घाम गाळला आहे. आता परिणीताचा हा अभ्यास प्रेक्षकांना किती आवडतो हे लवकरच थिएटर मध्ये समजून येईल. अभिनेता मानव कौल सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंदच्या यांच्या भूमिकेत या चित्रपटात दिसून येणार आहे. याशिवाय परेश रावलदेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. आधी श्रद्धा कपूरला या चित्रपटासाठी साइन केले गेले होते पण नंतर हा चित्रपट परिणीती चोप्राला मिळाला.

First published:

Tags: Bollywood, Parineeti Chopra, Saina Nehwal ., Upcoming movie, बायोपिक