• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • सलमान खानची तिसरी आई; सोशल मीडियावर व्हायरल होतोय PHOTO

सलमान खानची तिसरी आई; सोशल मीडियावर व्हायरल होतोय PHOTO

अभिनेता सलमान खानचा (Salman khan) एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल होत आहे.

  • Share this:
मुंबई, 01 मार्च :  बॉलिवूडचा सुलतान म्हणजे अभिनेता सलमान खानचा (Salman khan) एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत त्याची तिसरी आईदेखील दिसते आहे. सलमानची ही तिसरी आई म्हणजे रुक्मिणीबाई इंदूर. ज्यांच्यासमोर सलमानचा जन्म झाला होता. सलमानच्या आईच्या डिलीव्हरीच्या वेळी नर्स म्हणून त्या मदत करत होत्या. सलमान खानची तिसरी आई म्हणून ओखळल्या जाणाऱ्या रुक्मिणीबाई इंदूर येथील नर्सिंग होममध्ये काम करत होत्या. त्या ठिकाणीच 27 डिसेंबर 1965 रोजी सलमानचा जन्म झाला होता. त्यांनी स्वत:च्या हाताने सलमान खानच्या आईची डिलिव्हरी केली होती. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये रुक्मिणीबाई सलमान खानच्या पाया पडताना दिसत आहेत. 2018 मध्ये काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान दोषी आढळला होता. तेव्हा रुक्मिणीबाईंनी इंदूरमधील एका हनुमान मंदिरात जाऊन त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना केली होती. दरम्यान सलमान खानचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसचा 15 वा सीझन नुकताच संपला. या शोचा ग्रँड फिनाले 21 फेब्रुवारीला पार पडला. बिग बॉस संपल्यानंतर सलमान खान आता त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. शाहरुख खान स्टारर 'पठाण' चित्रपटामध्ये सलमान खान एका खास भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाच्या शूटिंगला तो लवकरच सुरुवात करणार आहे. हे वाचा - मराठमोळ्या अभिनेत्री अर्चना जोगळेकर आज परदेशात राहून करतात हे काम.... 'पठाण' अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून याची निर्मिती यशराज फिल्मद्वारे करण्यात येत आहे. 'वॉर' चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. शाहरुख खान गेल्या दोन वर्षांपासून रुपेरी पडद्यावरून गायब आहे. तो शेवटी 'झिरो' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात सलमान खानचा कॅमिओ रोल देखील होता. त्यानंतर आता सलमान पठाण चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पठाण चित्रपटातही सलमान खानचा कॅमिओ असणार आहे. तसंच सलमान खान 'टायगर 3' चित्रपटातून ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे वाचा - मैत्रिणीसोबत डान्स करताना रितेशचा घसरला पाय; मग जेनेलियानं काय केलं पाहा VIDEO दरम्यान, यापूर्वी 1998 मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट 'कुछ कुछ होता है' मध्ये सलमान खान पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाच्या माध्यमातून करण जोहरने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. दरम्यान, शाहरुख खानने देखील सलमान खानच्या 'ट्यूबलाइट' (2017) आणि 'हर दिल जो प्यार करेगा' (2000) या चित्रपटामध्ये खास भूमिका साकारल्या आहेत.
Published by:Aiman Desai
First published: