जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रणवीरला विचित्र अवस्थेत पाहून अभिनेत्रीनं घेतला धसका, व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाणच केलं बंद

रणवीरला विचित्र अवस्थेत पाहून अभिनेत्रीनं घेतला धसका, व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाणच केलं बंद

Ranveer Singh

Ranveer Singh

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. एक अशी अभिनेत्री आहे जी तो असला की व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायला घाबरते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 7 मार्च: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळते. रणवीर चाहता वर्ग मोठा आहे. अनेक चाहते त्याला भेटण्यासाठी नवं नवे पर्याय शोधत असतात. मात्र, एक अशी अभिनेत्री आहे जी तो असला की व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायला घाबरते. यामागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. बॉलिवूडचं ग्लॅमर, इथले कलाकार यांची जगभरात चर्चा होत असते. स्टार्सचा थाटमाट, त्यांच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅन हा त्यांच्या चाहत्यांसाठी कुतुहलाचा विषय असतो. ही व्हॅन म्हणजे कलाकारांसाठी सेकंड होमच असतं. व्हॅनिटी वॅन अनेक कलाकारांसाठी कम्फर्ट झोन असतो. मात्र, रणवीरसोबत असताना अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ही घाबरते. यामागचा किस्साही तिने एका मुलाखतीदरम्यान आपल्या चाहत्यांना शेअर केला होता. किल दिलची जाहिरात करताना, परिणीती चोप्राने तिचा सहकलाकार रणवीर सिंग आणि त्याच्या सवयींबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला. ती म्हणाली, मी सहसा कोणाच्याही मेकअप व्हॅनमध्ये ‘हॅलो मी आहे!’ म्हणत प्रवेश करते. पण रणवीरच्या व्हॅनमध्ये मला परवानगी घ्यावी लागते. याचा अर्थ असा नाही की तो झोपलेला असतो किंवा वॉशरूममध्ये आहे, त्याने कपडे घातले आहेत की नाही हे आहे. असा एक किस्सा घडला होता जेव्हा त्याने मला आत येण्यास सांगितले आणि मी प्रवेश केल्यावर तो कपड्यांशिवाय उभा होता. आणि मी त्याला कपड्यांशिवाय अनेकवेळा पाहिले आहे. बँड बाजा बारात या चित्रपटापासून तो असाच आहे. त्यात काही बदल झालेला नाही. त्यामुळे, रणवीरच्या व्हॅनमध्ये जाताना मात्र दहावेळा विचार करावा लागतो अशी भावना तिने मुलाखती दरम्यान व्यक्त केली. तसेच ती पुढे म्हणाली, रणवीरला लोकांमध्ये पँट काढायला आवडते. एकदा मी मेकअप करत होते. रणवीरही तिथंच होता. मी सहज मागं वळून पाहते तर काय, त्यानं पँट काढली होती. तेव्हापासून ती तो असताना व्हॅनिटी वॅनमध्ये जायला घाबरत असल्याचे परिणीतीने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात