मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कमल हसनच्या 'त्या' एका सल्ल्यानं बदललं रजनीकांतचं आयुष्य; मराठमोळा तरुण असा झाला तमिळचा थलाइवा

कमल हसनच्या 'त्या' एका सल्ल्यानं बदललं रजनीकांतचं आयुष्य; मराठमोळा तरुण असा झाला तमिळचा थलाइवा

रजनीकांत

रजनीकांत

लाख प्रयत्नांनंतर मराठमोळा तरुण तामिळ चित्रपटसृष्टीचा 'थलाइवा' झाला. कसा होता रजनीकांतचा हा पडद्यामागचा प्रवास चला जाणून घेऊया...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 मार्च : भारतीय चित्रपटसृष्टीत रजनीकांत यांना आज कोण ओळखत नाही. त्यांच्या दमदार अभिनयाची जादू वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. रजनीकांत आज भारतातीलअशा कलाकारांपैकी एक आहेत ज्यांना लोक देव मानून त्यांची पूजा करतात.  पण चित्रपटसृष्टीतील त्यांचा हा प्रवास फार सोपा नव्हता. यासाठी त्यांनी अनेक कष्ट उपसले आहेत. लाख प्रयत्नांनंतर मराठमोळा तरुण तामिळ चित्रपटसृष्टीचा  'थलायवा' झाला. कसा होता त्यांचा हा पडद्यामागचा प्रवास चला जाणून घेऊया...

ही कथा एका कुलीची आहे, जो एकेकाळी रेल्वे स्टेशनवर लोकांचे सामान उचलायचा. या कामातून गरजा पूर्ण होत नव्हत्या, म्हणून तो सुतार बनला आणि करवत, ब्लेडने आपल्या अंगातील कलेचे कसब दाखवले, यातूनही घर मात्र चालत नव्हते. मग त्यानंतर बस कंडक्टरची संधी त्याच्याकडे चालून आली. पण देवाने आपलं 'तिकीट' दुसऱ्या कुठल्यातरी कामासाठी कापलंय हे कदाचित त्याला माहीत नसावं. सावळ्या चेहऱ्याचा आणि सामान्य उंचीचा तो एक कुली, सुतार आणि नंतर बीबीटीमध्ये बस कंडक्टर असलेला तो तरुण तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार थलैवा बनला.

बॉलिवूडमध्ये एंट्रीतच ठरली हिट; पण लग्न करताच सोडलं करिअर; आता काय करते आमिर खानची 'ही' हिरॉईन?

रजनीकांत यांना अभिनेता व्हायचे होते. रजनीकांतचे हे स्वप्न मित्र राज बहादूर यांनी जिवंत ठेवले आणि त्यांनीच रजनीकांत यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले. राज बहादूर यांच्या आर्थिक पाठिंब्यामुळेच रजनीकांतचा संस्थेत प्रवेश शक्य झाला. रजनीकांत जेव्हा मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनय शिकत होते तेव्हा त्यांनी एका नाटकात दुर्योधनाची भूमिका केली होती. त्यांचा अभिनय पाहून दिग्दर्शकी  के.के. बालचंद्रन यांचे डोळे पाणावले.

बालचंद्रन रजनीकांतच्या अभिनयाने खूप प्रभावित झाले. त्यांनी त्याला तमिळ शिकण्याचा सल्ला दिला. रजनीकांतने दिग्दर्शकाची आज्ञा पाळली आणि लगेच तामिळ भाषेत काम सुरू केले. दिग्दर्शक बालकृष्णन यांना रजनीकांत यांच्या प्रतिभेची जाणीव होती. त्यांनी त्याला 'अपूर्व रागांगल' चित्रपटासाठी साइन केले. या चित्रपटाचा नायक कमल हासन होता. या चित्रपटात त्याने अत्याचारी पतीची भूमिका केली होती. या चित्रपटाला 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. हा रजनीकांतचा पहिला चित्रपट होता.

यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण तेव्हा कमल हसनने दिलेल्या एका सल्ल्यामुळे त्यांचं नशीब बदललं. कमल हसनने रजनीकांतला, 'जर तू सहाय्यक भूमिका आणि नकारात्मक भूमिका करत राहिलास तर तू कधीही हिरो बनू शकणार नाही.'असं  समजावून सांगितलं.  कमल हसनने त्यांना मुख्य अभिनेता म्हणून भूमिका करण्याचा सल्ला दिला. कमल हसन यांचा सल्ला पाळत रजनीकांत यांनी 1980 पर्यंत जवळपास 50 चित्रपट केले. त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.

1983 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अंधा कानून हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. यानंतर रजनीकांतने केवळ प्रगतीच्या पायऱ्या चढल्या. चालबाज, बुलंदी, रोबोटसह अनेक चित्रपट हिट झाले. आज ते दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार आहेत. रजनीकांत यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रजनीकांत यांना 2021 मध्ये दादासाहेब फाळके, 2016 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रजनीकांत यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment