जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Panchayat Season 3: कुठं आणि कधी रिलीज होणार 'पंचायत सीजन 3' सीरीज; अॅमेझॉन प्राइमवर कधी पाहता येणार?

Panchayat Season 3: कुठं आणि कधी रिलीज होणार 'पंचायत सीजन 3' सीरीज; अॅमेझॉन प्राइमवर कधी पाहता येणार?

कुठं आणि कधी रिलीज होणार 'पंचायत सीजन 3' सीरीज

कुठं आणि कधी रिलीज होणार 'पंचायत सीजन 3' सीरीज

‘पंचायत सीझन 1’ आणि ‘पंचायत सीझन 2’ च्या यशानंतर ‘पंचायत सीझन 3’ ची रिलीज डेट समोर आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पसंतीची हिंदी वेब सिरीज ‘पंचायत’ची क्रेझ वाढत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 जुलै- ‘पंचायत सीझन 1’ आणि ‘पंचायत सीझन 2’ च्या यशानंतर ‘पंचायत सीझन 3’ ची रिलीज डेट समोर आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पसंतीची हिंदी वेब सिरीज ‘पंचायत’ची क्रेझ वाढत आहे. ही सिरीज अॅमेझॉन प्राइमवर देखील पाहता येणार आहे. प्रत्येकजण सीझन 3 साठी खूप उत्साहित आहे आणि आता त्याच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. पंचायत सीझन 3 मार्च 2024 मध्ये रिलीज होणार आहे. यापूर्वी हा शो खूप हिट झाला आहे, त्यामुळे निर्माते या सीझनसाठी काही खास गोष्टी करत आहेत. वाचा- 1957चा ब्लॉकबस्टर सिनेमा, 60 कोटींचं बजेट अन् कमावले 8 लाख ‘पंचायत सीझन 3’ या वेब सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, चंदन रॉय आणि फैसल मलिक यांच्यासह काही नवीन कलाकार देखील आहेत. पंचायत सीझन 1 ची अशी होती कथा ही एक कॉमेडी-ड्रामा वेब सिरीज आहे ज्याला एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याबद्दल पंचायत कार्यालयात सचिव म्हणून नोकरी मिळते. ‘पंचायत सीझन 1’ ची कथा आठ भागांची आहे आणि ती खूपच रोमांचकही आहे.

पंचायत 3 ची अशी आहे कथा ‘पंचायत’ चा सीझन 3 हा सीझन प्राइम व्हिडिओवर लॉन्च होणार आहे, या सीझनमध्ये एकूण 8 एपिसोड असतील. चाहते ‘पंचायत सीझन 3’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पंचायत सीझन 3’ लोकांना कितपत आवडते हे पाहणे बाकी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात