मुंबई, 31 जानेवारी : बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमधले अभिनेते आणि अभिनेत्रींचं खासगी आयुष्य चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरतं. हॉलिवूडमधले अनेक अभिनेते, अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतात. हॉलिवूडमधली 90च्या दशकातली अभिनेत्री पामेला अँडरसन नेहमीच तिच्या खासगी, तसंच व्यावसायिक आयुष्यातल्या घडामोडींमुळे चर्चेत असते. सध्या पामेला अशाच एका खास कारणामुळे चर्चेत आहे. पामेलाचा केवळ 12 दिवस पती राहिलेला हॉलिवूड निर्माता जॉन पीटर्सने त्याच्या वारसपत्रात पामेलाच्या नावे मोठ्या रकमेची तरतूद केली आहे. सध्या त्याची चर्चा आहे. हॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पामेला अँडरसरन 90च्या दशकात सर्वांत लोकप्रिय सेलेब्रिटी मानली जात असे. ही अभिनेत्री जितकी तिच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत होती, तितकीच तिच्या पर्सनल लाइफमुळेदेखील चर्चेत आली. आतापर्यंत सहा विवाह केलेली ही अभिनेत्री एका धक्कादायक गोष्टीमुळे सध्या चर्चेत आहे. पामेलाचा केवळ 12 दिवस पती राहिलेला हॉलिवूड निर्माता जॉन पीटर्स याने त्याच्या वारसापत्रात पामेलाच्या नावे मोठ्या रकमेची तरतूद केली आहे. हेही वाचा - दिव्या भारतीमुळे एकत्र आले काजोल-अजय? अभिनेत्रीनं सांगितला हनिमूनचा ‘तो’ प्रसंग शनिवारी ‘व्हरायटी’शी संवाद साधताना जॉन पीटर्सनं सांगितलं की, ‘मी माझ्या वारसापत्रात पूर्वीच्या पत्नीला 10 दशलक्ष डॉलर्स देण्याचं नमूद केलं आहे. (भारतीय चलनात ही रक्कम 81 कोटी 51 लाख रुपये होते.) पामेलाला या पैशांची गरज असली किंवा नसली तरी ते तिच्यासाठीच असतील. पामेलाला याविषयी माहिती नाही. माझ्या हृदयात पामेलाविषयी नेहमीच प्रेम राहील’. कोइमोईच्या वृत्तानुसार जॉन आणि पामेला 1980मध्ये एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 20 जानेवारी 2020 रोजी हे दोघं विवाहबद्ध झाल्याची बातमी समोर आली. पामेला आणि जॉन यांना मालिबू इथं लग्न केल्याचं समोर आलं. पामेलाच्या प्रतिनिधींनी याला दुजोरा दिला होता. दोघांचंही हे पाचवं लग्न होतं. ‘द हॉलिवूड रिपोर्टर’शी बोलताना जॉननं सांगितलं होतं की, ‘सुंदर मुली सगळीकडे असतात. मी आरामात एखाद्या मुलीची निवड करू शकलो असतो; पण मी 35 वर्षांपासून पामेलाच्या प्रेमात होतो’. हेही वाचा - Tejaswini Pandit : संजय जाधवबरोबरच्या नात्याबद्दल तेजस्विनीचं पहिल्यांदा भाष्य; म्हणाली तो माझा… विशेष म्हणजे या दोघांनी त्यांच्या लग्नाची कायदेशीर कागदपत्रं तयार केली नाहीत. त्यानंतर पामेलाने 1 फेब्रुवारीला जाहीर केलं, की तिने आणि पीटर्सने त्यांच्या विवाह प्रमाणपत्राची औपचारिक प्रक्रिया केलेली नाही. ‘आम्ही काही काळ वेगळे होत आहोत. आम्हाला आमच्या जीवनातून आणि एकमेकांकडून जे हवं आहे ते आम्हाला मिळत असल्याची खात्री करण्यासाठी आणि यामध्ये तुमच्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ राहू’, असं पामेलानं म्हटलं होतं. काही काळानंतर जॉनसोबतच्या नात्याबद्दल पामेलाने ट्विटरवर एक स्टेटमेंट लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं की, ‘पामेला अँडरसनने जॉन पीटर्सशी कधीही कायदेशीर विवाह केला नव्हता. या स्टेटमेंटमध्ये पामेलाने जॉनला तिचा आयुष्यभराचा कौटुंबिक मित्र म्हटलं होतं. कोणतीही कठोर भावना नाही, लग्न नाही, घटस्फोट नाही, फक्त एक विचित्र थिएट्रिकल लंच’, असंदेखील तिनं नमूद केलं होतं. पामेला आणि जॉन केवळ पाच दिवस एकमेकांसोबत होते आणि जॉनने टेक्स्ट मेसेजद्वारे पामेलासोबत ब्रेकअप केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर जॉनने त्याच्या वारसापत्रात पामेलासाठी नमूद केलेली मोठी रक्कम चर्चेचा विषय ठरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.