Home /News /entertainment /

कोरोनानंतर आता चक्रीवादळ; कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी असं काम केलं नसेल! अर्शद वारसीनं केलं ठाकरेंचं कौतुक

कोरोनानंतर आता चक्रीवादळ; कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी असं काम केलं नसेल! अर्शद वारसीनं केलं ठाकरेंचं कौतुक

चक्रीवादळांपासून सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईत अनेक वर्षांनी निसर्ग चक्रीवादळ येऊन धडकलं आहे.

    मुंबई, 3 जून : सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चालली आहे. आधी कोरोना व्हायरस आणि आता हे निसर्ग चक्रीवादळ. यासंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे जनसतेशी संवाद साधला. यानंतर बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी यानं एक ट्वीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचं कौतुक करत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ऑनलाइन कॉन्फरन्स नंतर अर्शद वारसीनं एक ट्वीट केलं. त्यानं लिहिलं, 'मला नाही वाटत उद्धव ठाकरे यांच्या एवढा संकटांचा सामना आजवर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी कार्यकालावधीच्या सुरुवातीलाच केला असेल. सध्या मुंबई एका प्राणघातक विषाणूच्या विळख्यात अडकली आहे. हे कमी होतं की काय तेवढ्यात चक्रीवादळ येत आहे.' त्याचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चक्रीवादळांपासून सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईत अनेक वर्षांनी निसर्ग चक्रीवादळ येऊन धडकलं आहे. निसर्ग चक्रीवादळाने दिवेआगर ते अलिबाग दरम्यान जमिनीवर प्रवेश केला. दुपारी एकच्या सुमारास वादळ धडकल्यानंतर पुढचे तीन ते चार तास लँडफॉलची प्रक्रिया सुरू राहील. त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी पुढचे काही तास सावध राहणं आवश्यक आहे. चक्रीवादळाने अलिबागच्या दक्षिणेला जमिनीवर प्रवेश केला. आता ते मुंबई, ठाणे जिल्ह्यांना तडाखा देत नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून प्रवेश करेल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. रेखा-अमिताभ यांचे लव्ह सीन पाहिल्यावर काय झाली होती जया यांची अवस्था 'काकानं चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला...' नवाझुद्दीनवर पुतणीनं केले गंभीर आरोप अक्षयनं खास परवानगी घेत लॉकडाऊनमध्ये केलं 'या' जाहिरातीचं शूटिंग, पाहा VIDEO
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Uddhav thackeray

    पुढील बातम्या