Home /News /entertainment /

दोन वेळा घटस्फोट आणि सिंगल मदर, तिसऱ्यांदा प्रेमात पडलीय श्वेता तिवारी

दोन वेळा घटस्फोट आणि सिंगल मदर, तिसऱ्यांदा प्रेमात पडलीय श्वेता तिवारी

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत श्वेतानं ती पुन्हा एकदा प्रेमात असल्याचा खुलासा केला आहे.

  मुंबई, 3 जून : टीव्ही असो किंवा मग बॉलिवूड प्रेम, लग्न, घटस्फोट अशी उदाहरण तशी पहायला गेली तर इथे अजिबात कमी नाही. ‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारीचं वैवाहिक जीवन नेहमीच वादग्रस्त राहिलं. श्वेतानं 2 लग्न केली मात्र दोन्ही वेळा तिला अपयश आलं. तिची दोन्ही लग्न तुटली. पण तरीही ती हारली नाही. तिने तिच्या आयुष्यात आलेल्या सर्व समस्यांचा सामना केला. तसेच ती तिच्या दोन्ही मुलांना एकटी सांभाळत आहे. दरम्यानं काही दिवसांपूर्वीच श्वेतानं ती पुन्हा एकदा प्रेमात असल्याचा खुलासा केला आहे. काही महिन्यांपूर्वी श्वेता तिवारी तिचा दुसरा पती आणि त्या लग्नामुळे तिच्या आयुष्यात आलेल्या समस्यांमुळे चर्चेत आली होती. एवढंच नाही तर तिनं दुसरा पती अभिनव कोहलीवर शारिरीक हिंसेचा आरोप केला होता. यात तिनं त्यानं आपल्या मुलीलाही त्रास दिल्याचं म्हटलं होतं. अशात दोन लग्न आणि दोन घटस्फोट झालेली 2 मुलांची आई श्वेतानं जेव्हा तिच्या तिसऱ्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा सर्वच हैराण झाले. चक्रीवादळ आलं... मराठी कलाकारांनी मुंबईकरांना केलं घरी राहण्याचं आवाहन
  View this post on Instagram

  My #nanhayatri Loveees playing with Dough! Last week, i came across a video on @johnsonsbabyindia , on 'How to make colorful play dough for babies'. Reyansh and i drew inspiration from this interactive indoor activity and tried our hand at it too! Taking into consideration how babies tend to chew on toys, colorful edible play dough is a safe alternative. It is not only fun to play with but also helps in developing their sensory skills. We had an absolute blast doing this together! As a family, in this time of uncertainty, we decided to come together to create memorable moments and a positive atmosphere for each other, with each other. Try this engaging activity with your little one, capture and share your moments, tagging @johnsonsbabyindia and the best will stand a chance to feature on their brand page! Dough it! #CHOOSEgentle #GentleTogether

  A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

  श्वेताला काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सध्या ती कोणाच्या प्रेमात आहे असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना श्वेता म्हणाली, मी सुरुवातीपासूनच माझ्या दोन्ही मुलांच्या (पलक आणि रेयांश) प्रेमात आहे. त्यामुळे आता दुसऱ्या कोणत्या व्यक्तीसाठी अजिबात वेळ नाही. श्वेता तिवारी पुढे म्हणाली, माझ्या मुलांवर माझं एवढं प्रेम आहे की मला त्यांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या कोणत्याच व्यक्तीची आता गरज वाटत नाही. माझ्या मुलांसोबत मी खूप खूश आहे. अक्षयनं खास परवानगी घेत लॉकडाऊनमध्ये केलं 'या' जाहिरातीचं शूटिंग, पाहा VIDEO
  View this post on Instagram

  LOVE 💓 MY #nanhayatri

  A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

  श्वेता तिवारीनं 1998 मध्ये राजा चौधरीशी लग्न केलं होतं मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिनं अभिनव कोहलीशी लग्न केलं मात्र तिचं हे लग्न सुद्धा जास्त काळ टिकू शकलं नाही. राजा चौधरीपासून श्वेताला पलक नावाची मुलगी आहे. तर अभिनवपासून रेयांश नावाचा एक मुलगा आहे. सध्या श्वेता ‘मेरे डॅड की दुल्हन’मध्ये काम करत आहे. याशिवाय लॉकडाऊनच्या आधी रिलीज झालेल्या ‘हम तुम और देम’ या वेब सीरिजमध्ये तिचा बोल्ड लुक पाहायला मिळाला होता. 'काकानं चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला...' नवाझुद्दीनवर पुतणीनं केले गंभीर आरोप
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या