• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘मराठी संस्कृतीची इज्जत घालवणं थांबवा’; आशय कुलकर्णीच्या त्या व्हिडीओवर नेटकरी संतापले

‘मराठी संस्कृतीची इज्जत घालवणं थांबवा’; आशय कुलकर्णीच्या त्या व्हिडीओवर नेटकरी संतापले

पाहिले ना मी तुला फेम आशयनं केली ट्रोलर्सची बोलती बंद; ‘संस्कृती आणि इज्जत घालवली नाहीये…’

 • Share this:
  मुंबई 24 मे: पाहिले ना मी तुला (Pahile Na Mi Tula) ही सध्या छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत शशांक केतकर (Shashank Ketkar) आणि आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) यांची जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळत आहे. अगदी त्यांचे ऑफस्क्रिन व्हिडीओ देखील प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतात. असाच एक गंमतीशीर व्हिडीओ आशयनं इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी संतापले अन् त्यांनी आशवर जोरदार टीका केली. (viral video) ही टीका पाहून तो देखील शांत बसला नाही. अन् त्यानं देखील रोखठोक प्रतिक्रिया देत ट्रोलर्सची बोलती बंद केली.
  बनवाबनवी करणाऱ्या 'देवमाणसा'चा 'हृदयी वसंत...' वर भन्नाट डान्स, पाहा VIDEO अभिनेता आशय कुलकर्णीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मानसीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तन्वी मुंडे हिला त्यानं खांद्यावर उचलून स्क्वॅट मारले आहेत. ‘उचलले ना मी तुला… 50 किलो स्क्वॉट चॅलेंज’ असं कॅप्शन देत त्यानं हा व्हिडीओ शेअर केला. मात्र हा व्हिडीओ काही नेटकऱ्यांना आवडला नाही. त्यांनी व्हिडीओवर जोरदार टीका केली. यापैकी एका युझरनं तर “लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी मराठी संस्कृतीची अशी इज्जत घालवू नका” असा टोला लगावला. यावर आशय संतापला अन् त्यानं देखील “अजिबात संस्कृती आणि इज्जत घालवली नाहीये . आधी लक्ष वेधून घेण्यासाठी अशा कमेंट्स करणं बंद करा.” अशी प्रतिक्रिया देत त्यांची बोलती बंद केली. लॉकडाऊनमुळं ‘पाहिले ना मी तुला’ मालिकेचं शूटिंग सध्या गोव्यात सुरु आहे. मालिकेमध्ये अनिकेत आणि मानसी यांनी लपून केलेल्या लग्नाचं गुपित आई-वडिलांसमोर फोडल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे चिडून वडील तिला घराबाहेर हाकलतात. त्यानंतर अनिकेत आणि मानसी नव्या संसाराला सुरुवात करतात. असं काहीसं कथानक मालिकेत आतापर्यंत दाखवलं आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: