झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड घातलं आहे. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. हे कलाकार सेटवर सुद्धा एकमेकांच्या खुपचं जवळ आहेत. सेटवर सुद्धा नेहमीच मजामस्ती करताना नेहमीचं दिसतात. सध्या या कलाकारांचा एक व्हिडीओ जोरदार चर्चेत आहे. (हे वाचा:ओळखा पाहू हा लहान मुलगा आहे कोण? आज आहे मराठीतील नामांकित अभिनेता ) हे कलाकार सेटवर ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यावर मजेशीर डान्स करत आहेत. प्रत्येक कलाकाराने हातात चप्पल पासून पाण्याच्या जार पर्यंत मिळेल ती वस्तू घेऊन ठेका धरला आहे. यामध्ये डॉक्टर पासून डिंपलच्या आज्जीपर्यंत सर्वांचाचं समावेश आहे. हा व्हिडीओ समोर येताच मोठ्या प्रमाणवर व्हायरल झाला आहे. आणि चाहत्यांना कलाकारांचा हा अंदाज खूप आवडला सुद्धा आहे. चाहते यावर भरभरून दाद देत आहेत. (हे वाचा:‘सुंदरा मनामध्ये भरली’मध्ये आला नवा टर्न; लतिकाची एन्ट्री पाहून अभ्या झाला फिदा) सध्या ‘देवमाणूस’ ही मालिका शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. डॉक्टरने आज पर्यंत केलेल्या खुनांचा आता छडा लागणार असं दिसत आहे. कारण ACP दिव्या जंग जंग पछाडून पुरावे गोळा करत आहे. डॉक्टर पुरावे नष्ट करण्याचे सगळे प्रयत्न करत आहे. मात्र दिव्या रोज एक नवा पुरावा शोधत आहे. मालिकेमध्ये सध्या डिंपल आणि डॉक्टरच्या लग्नाचा घाट घातला आहे. कारण त्याच्या आड त्याला सर्व पुरावे कायमचे नष्ट करता यावेत. मात्र डॉक्टर दिव्या पासून किती दिवस आपला बचाव करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.