जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'वाह उस्ताद', तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्काराने करण्यात आलं सन्मानित

'वाह उस्ताद', तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्काराने करण्यात आलं सन्मानित

'वाह उस्ताद', तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्काराने करण्यात आलं सन्मानित

तबल्याच्या तालावर लोकांना नाचायला भाग पाडणारे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मविभूषण पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 फेब्रुवारी- तबल्याच्या तालावर लोकांना नाचायला भाग पाडणारे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मविभूषण पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. तबल्यावर ताल वाजवण्याची पद्धत विकसित करून त्यांनी तबल्याला जगातील सर्वात लोकप्रिय आशियाई वाद्यांपैकी एक म्हणून स्थापित केले. 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च पुरस्कार पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मविभूषण पुरस्कार 2023 जाहीर झाला होता. वाचा- सोनू निगमला आमदाराच्या पुत्राने केली धक्काबुक्की, मुंबईत कॉन्सर्टवेळी घटना तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना संगीताच्या जगातील सर्वात मोठा ग्रॅमी पुरस्कार दोनदा मिळाला आहे. हुसेन यांना केवळ तबला वाजवण्यातच रस नव्हता तर त्यांना अभिनयाचीही आवड होती. 1983 मध्ये झाकीर हुसैन यांनी ‘हीट अँड डस्ट’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

जाहिरात

झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. तबला वाजवाचे कौशल्य त्यांना त्यांचे वडील अल्ला रक्खा खान यांच्याकडून मिळाले,  जे स्वत: प्रसिद्ध तबलावादक होते. हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथेदेखील शिक्षण घेतले. त्यांच्या वडिलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली.

News18लोकमत
News18लोकमत

हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. ते वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली. ते 1970 साली सतारवादक पं. रवीशंकर ह्यांना तबल्याची साथ करण्यासाठी अमेरिकेला गेले. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला आणि 1973 मध्ये त्यांनी ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ नावाचा पहिला अल्बम लॉन्च केला. झाकीर ह्यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी पंडित रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात