जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सोनू निगमला आमदाराच्या पुत्राने केली धक्काबुक्की, मुंबईत कॉन्सर्टवेळी घटना

सोनू निगमला आमदाराच्या पुत्राने केली धक्काबुक्की, मुंबईत कॉन्सर्टवेळी घटना

sonu nigam

sonu nigam

सोनू निगम स्टेजवरून खाली येत असताना आधी सोनू निगमच्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. त्यानंतर सोनू निगमलासुद्धा धक्का दिला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 फेब्रुवारी : चेंबुरमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना गायक सोनू निगमला धक्काबुक्की  झाल्याचा प्रकार घडला आहे. सेल्फी घेण्यावरून हा प्रकार घडला होता. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलावर धक्काबुक्कीचा  आरोप आहे. सोनू निगमने या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. धक्काबुक्की करत  दुखापत केल्याचं आणि चुकीच्या पद्धतीने अडवल्याप्रकरणी त्याने तक्रार केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. चेंबूर फेस्टिव्हलमध्ये सोनू निगम परफॉर्म करत होता. पोलिसात दाखल तक्रारीनुसार आमदाराच्या मुलाने सोनू निगमच्या व्यवस्थापक सायरा यांच्याशी गैरवर्तन केलं. त्यानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली येत असताना आधी सोनू निगमच्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. त्यानंतर सोनू निगमलासुद्धा धक्का दिला. डीसीपी हेमराज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपीचे नाव स्वप्निल फातर्पेकर असं आहे. हेही वाचा :  शक्ती कपूर ते विवेक ओबेरॉय; एका चूकीनं या प्रसिद्ध सेलेब्सचं करिअर केलं फ्लॉप सोनू निगमने या हल्ल्यानंतर बोलताना म्हटलं की, कॉन्सर्टनंतर स्टेजवरून खाली येत असताना एका व्यक्तीने मला पकडलं आणि त्याने हिर आणि रब्बानी यांना धक्का दिला. ते दोघेही मला वाचवण्यासाठी आले होते. मी पायऱ्यांवर पडलो. मी याची तक्रार दाखल केली आहे. लोकांनी जबरदस्तीने सेल्फी आणि धक्काबुक्की पुन्हा करू नये यासाठी मी तक्रार केलीय. जर काही लोखंडाच्या सळ्या असत्या तर रब्बानीचा मृत्यू झाला असता अशा पद्धतीने त्याला धक्का दिला होता. व्हिडीओत दिसतं की मीसुद्धा खाली पडलो असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात