लॉस एंजलिस, 31 मार्च: यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात जिंकलेल्या पुरस्कारांपेक्षा चर्चेत राहिला तो विल स्मिथ आणि क्रिस रॉक (Will Smith Slapped Cris Rock) यांचा किस्सा. ऑस्कर अवॉर्ड्स सुरू असताना प्रेझेंटर क्रिस रॉकने विलच्या पत्नीची खिल्ली उडवल्याने, विल स्मिथ संतापला आणि त्याने स्टेजवर येत क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर संपूर्ण ऑडिटोरियम शांत झाले होते. दरम्यान या घटनेनंतर प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आणि ऑस्कर पुरस्कार विजेता विल स्मिथ अडचणीत येऊ शकतो. ऑस्कर अकादमीने विल स्मिथवर शिस्तभंगाची (Academy started disciplinary proceedings against Will Smith) कारवाई सुरू केली आहे. या घडल्या प्रकारानंतर मात्र अकादमीने ट्वीट केले होते की, कोणत्याही प्रकारची हिंसा स्वीकारत नाही.
विल स्मिथने 27 मार्च रोजी लॉस एंजलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये झालेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान क्रिस रॉकच्या कानशिलात बजावली होती. त्याने विल स्मिथच्या पत्नीच्या केसांबद्दल खिल्ली उडवली. त्यामुळे विल स्मिथला प्रचंड राग आला आणि स्मिथ थेट स्टेजवर गेला आणि क्रिस रॉकच्या कानाखाली जाळ काढला. क्रिस रॉकने फिल्म G.I. Jane सिनेमाबद्दल विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ (Jada Pinkett Smith) ची खिल्ली उडवली. क्रिस रॉकने जेडाच्या टकलेपणाबाबत टिप्पणी केली होती. विल स्मिथची पत्नी जेडाही Alopecia नावाच्या केसगळतीच्या व्याधीमुळे त्रस्त आहे.
हे वाचा-Will Smith कडून Oscar च्या मंचावर कानशिलात खाल्ल्यानंतर Chris Rock चा मोठा निर्णय
स्मिथला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
ही घटना घडल्यानंतर विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. त्याला '‘किंग रिचर्ड’ या सिनेमासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. यावेळी भाषण करताना त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याने त्याच्या कृत्याबद्दल सर्वांची माफी मागितली. मात्र त्याच्या सिनेमाच्या उदाहरण देत त्याने असेही म्हटले की, त्याच्या कुटुंबासाठी किती प्रोटेक्टिव्ह आहे. शिवाय विल स्मिथने सोशल मीडियावर देखील लांबलचक पोस्ट लिहून माफी मागितली होती. जरी क्रिस रॉकने पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला नसला तरी अकादमी विल स्मिथला माफ करण्याचा मूडमध्ये आहे असं दिसत नाही आहे.
कार्यक्रमातून बाहेर जाण्यास दिला होता विल स्मिथने नकार
अकादमीकडून या घटनेनंतर असे स्पष्टीकरण देण्यात आले होते की अशाप्रकारच्या घटना स्विकारल्या जाणार नाहीत आणि विल स्मिथविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, त्यानंतर आता अकादमीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. या घटनेनंतर विल स्मिथला कार्यक्रमातून बाहेर जाण्यास सांगितले होते. मात्र विल स्मिथने तसे करण्यास नकार दिला होता, असेही अकादमीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कॅलिफोर्निया कायद्यानुसार होणार कारवाई
या घटनेच्या एका दिवसानंतर, म्हणजे 28 मार्च रोजी, अकादमीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ते विल स्मिथच्या कृतीचा निषेध करते. अधिकृत तपासाची घोषणा करताना, अकादमीने सांगितले की आम्ही अधिकृतपणे घटनेचा आढावा सुरू केला आहे आणि आम्ही पुढील कारवाई करू. अकादमीने पुढे असे म्हटले आहे की, आमचे नियम, मानके आणि कॅलिफोर्निया कायद्यानुसार निकालापर्यंत पोहोचले जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hollywood, Oscar, Oscar award show