लॉस एंजलिस, 28 मार्च: विल स्मिथ (Will Smith) कडून Oscar च्या मंचावर कानशिलात खाल्ल्यानंतर Chris Rock ने मोठा निर्णय घेतला आहे. कॉमेडियन क्रिस रॉक (Chris Rock) ने या संपूर्ण घटनेवर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला आहे. सर्वांसमक्ष ही घटना घडल्यानंतरही क्रिस पोलिसांकडे जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. लॉस एंजलिस पोलीस विभागाने याबाबत माहिती दिली आहे. ऑस्कर अवॉर्ड्स सुरू असताना प्रेझेंटर क्रिस रॉकने विलच्या पत्नीची खिल्ली उडवल्याने, विल स्मिथ संतापला आणि त्याने स्टेजवर येत क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर संपूर्ण ऑडिटोरियम शांत झाले होते. नेमकं काय घडलं? हॉलिवूडचा सुपरस्टार विल स्मिथ ने सुत्रसंचालन करणाऱ्या क्रिस रॉकला स्टेजवर जाऊन जोरात कानाखाली लगावली. या घटनेमुळे कार्यक्रमात एकच खळबळ उडाली. त्याचं झालं असं की, Oscars 2022 सोहळ्याची शानदार सुरूवात झाली. यावेळी क्रिस रॉकने पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचालन केलं. थटा मस्करी करत क्रिस रॉकने सोहळ्यात चांगलीच रंगत आणली होती. पण, त्याने विल स्मिथ (Will Smith) च्या पत्नीच्या केसांबद्दल खिल्ली उडवली. त्यामुळे विल स्मिथला प्रचंड राग आला आणि स्मिथ थेट स्टेजवर गेला आणि क्रिस रॉकच्या कानाखाली जाळ काढला. क्रिस रॉकने फिल्म G.I. Jane सिनेमाबद्दल विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ (Jada Pinkett Smith) ची खिल्ली उडवली. क्रिस रॉकने जेडाच्या टकलेपणाबाबत टिप्पणी केली होती. विल स्मिथची पत्नी जेडाही Alopecia नावाच्या केसगळतीच्या व्याधीमुळे त्रस्त आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार या घटनेनंतर क्रिसने पोलिसात जाण्यास नकार दिला आहे. हे वाचा- Oscars 2022 सोहळ्यात धक्कादायक प्रकार, विल स्मिथने क्रिस रॉकच्या थोबाडीत लगावली, LIVE VIDEO ही घटना ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासातील न विसरता येण्यासारखी घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही क्षणार्धात व्हायरल झाला. दरम्यान नेटकरी या प्रकारानंतर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. क्रिसने जेडाबद्दल असे वक्तव्य करायला नको होते आणि विलने देखील एवढ्या मोठ्या मंचावर अशी हिंसक प्रतिक्रिया द्यायला नको होती, अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत.
The Academy does not condone violence of any form.
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
Tonight we are delighted to celebrate our 94th Academy Awards winners, who deserve this moment of recognition from their peers and movie lovers around the world.
अकॅडमीकडून देखील याबाबत स्पष्टीकरण समोर आले आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नसल्याचे ट्वीट शेअर केले आहे. ही घटना घडल्यानंतर विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. त्याला ‘‘किंग रिचर्ड’ या सिनेमासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. यावेळी भाषण करताना त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याने त्याच्या कृत्याबद्दल सर्वांची माफी मागितली. मात्र त्याच्या सिनेमाच्या उदाहरण देत त्याने असेही म्हटले की, त्याच्या कुटुंबासाठी किती प्रोटेक्टिव्ह आहे.