मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Oscars 2022 सोहळ्यात धक्कादायक प्रकार, विल स्मिथने क्रिस रॉकच्या थोबाडीत लगावली, LIVE VIDEO

Oscars 2022 सोहळ्यात धक्कादायक प्रकार, विल स्मिथने क्रिस रॉकच्या थोबाडीत लगावली, LIVE VIDEO

 विल स्मिथ (Will Smith) ने क्रिस रॉक (Chris Rock) ला स्टेजवर जाऊन जोरात कानाखाली लगावली. या घटनेमुळे कार्यक्रमात एकच खळबळ..

विल स्मिथ (Will Smith) ने क्रिस रॉक (Chris Rock) ला स्टेजवर जाऊन जोरात कानाखाली लगावली. या घटनेमुळे कार्यक्रमात एकच खळबळ..

विल स्मिथ (Will Smith) ने क्रिस रॉक (Chris Rock) ला स्टेजवर जाऊन जोरात कानाखाली लगावली. या घटनेमुळे कार्यक्रमात एकच खळबळ..

    नवी दिल्ली, 28 मार्च : चित्रपट सृष्टीत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या Oscars 2022 सोहळ्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉलीवूडचा सुपरस्टार विल स्मिथ (Will Smith) ने सुत्रसंचालन करणाऱ्या क्रिस रॉक (Chris Rock) ला स्टेजवर जाऊन जोरात कानाखाली लगावली. या घटनेमुळे कार्यक्रमात एकच खळबळ उडाली. त्याचं झालं असं की, Oscars 2022 सोहळ्याची शानदार सुरूवात झाली. यावेळी  क्रिस रॉक (Chris Rock) याने पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचालन केलं. थटा मस्करी करत क्रिस रॉकने सोहळ्यात चांगलीच रंगत आणली होती. पण, त्याने विल स्मिथ (Will Smith) च्या पत्नीच्या केसांबद्दल खिल्ली उडवली. त्यामुळे विल स्मिथला प्रचंड राग आला आणि स्मिथ थेट स्टेजवर गेला आणि  क्रिस रॉकच्या कानाखाली जाळ काढला. नेमकं काय घडलं? क्रिस रॉकने फिल्म G.I. Jane सिनेमाबद्दल विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ (Jada Pinkett Smith) ची खिल्ली उडवली होती. क्रिस रॉकने जेडाच्या टकलेपणाबाबत टिप्पणी केली होती. 'G.I. Jane 2 सिनेमाची जेडा वाट पाहू शकत नाही. कारण या सिनेमात मुख्य पात्र हे टक्कल पडलेली व्यक्ती करत आहे. विल स्मिथची पत्नी जेडाही Alopecia नावाच्या केसगळतीच्या व्याधीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे तिला हटवण्यात आलं होतं. याच मुद्यावरून क्रिस रॉकने केलेला विनोद विल स्मिथला आवडला नाही आणि त्याने स्टेजवर जाऊन क्रिस रॉकच्या थोबाडीत लगावली. स्मिथच्या या कृत्यामुळे पुरस्कार सोहळ्यात एकच खळबळ उडाली.  मार पडल्यामुळे क्रिस रॉक काही वेळ जागेवर स्तब्ध झाला होता. विलने त्याला बजावले की तुझ्या तोंडून आता माझ्या पत्नीचे नाव घेऊ नको. त्यानंतर क्रिस रॉकने परत असं करणार नाही, असं सांगितलं आणि वादावर पडदा टाकला. (तुमचं कॅन्सल झालेलं Ration Card कसं कराल अ‍ॅक्टिव्ह? पाहा प्रोसेस) या घटनेमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. स्मिथचे चाहते त्याच्या या कृत्यामुळे अवाक् झाले आहे.  ऑस्कर्स 2022 पुरस्कारात सामील झालेले अनेक अभिनेते आणि दिग्गज या प्रकरणामुळे स्तब्ध झाले. तर टीव्हीवर पाहणारे प्रेक्षकही हैराण झाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या