तुमची 'ही' आवडती मालिका घेणार निरोप

तुमची 'ही' आवडती मालिका घेणार निरोप

मालिका प्रेक्षकांसाठी एक मोठा विरंगुळा असतो. एखाद्या मालिकेचं व्यसन लागतं. पण आता एक मालिका संपतेय.

  • Share this:

मुंबई, 01 जून : मालिका प्रेक्षकांसाठी एक मोठा विरंगुळा असतो. अनेकदा दिवसभरातले सगळे तणाव या मालिका पाहत पाहत प्रेक्षक विसरून जातो. मालिकेतली पात्रं त्याच्याही आयुष्यातली महत्त्वाचे घटक बनतात. मग अनेकदा मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांच्यातल्या गप्पांमध्ये विषय असतात ते मालिकांचेच. ईशाचं आता काय होणार? तो अण्णा किती वाईट आहे, अशा चर्चा रंगतात. पण तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी. तुमची आवडती मालिका आता संपतेय.

तुला पाहते रे मालिकेतला सगळा सस्पेन्स आता संपत चाललाय. ईशालाच कळलंय की तीच राजनंदिनी आहे. अर्थात विक्रांतला अजून हे माहीत नाहीय. त्यामुळे अजून मालिकेत काय होणार, याची उत्सुकता आहेच. पण आता या महिन्याच्या शेवटी मालिका संपणार आहे.

पाठकबाईंना नेहमी आव्हान देणाऱ्या नंदिता वहिनीचं हे आधुनिक रूप पाहिलंत का?

मालिका जेव्हा सुरू झाली तेव्हा सुबोध भावेनं सांगितलं होतं की या मालिकेचा शेवट माहीत असल्यानंच मी ती स्वीकारली. एरवी मालिका पाणी घालून वाढवत राहतात.

विकेंडला पुन्हा एकदा दिसला मलाइका अरोराचा हॉट अवतार

आतापर्यंत ईशा राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे, हे विक्रांतला दाखवायचं असतं. पण खरोखर ईशाला सगळं आठवल्याचं मालिकेत दाखवलंय. त्यामुळे आता ते विक्रांतच्याच जिवावर उठणार आहे.

सैफ-करिनाच्या लग्नाचा फोटो व्हायरल, असे दिसायचे सारा- इब्राहिम

गजा पाटील हा सरंजामे कंपनीत मोठा भ्रष्ट माणूस आहे आणि तो कित्येक वर्ष सरंजामे कंपनीला फसवत आहे हे ईशाला समजताच ती गजा पाटीलच्या मागावर लागते. या प्रकरणाने विक्रांत मात्र पुरता हादरतो. त्याला आता असं वाटू लागतं की जर ईशाने या प्रकरणाचा छडा लावला तर तिला हे समजणार की गजा पाटील म्हणजेच विक्रांत सरंजामे. त्यामुळे घाबरलेला विक्रांत भलत्याच माणसाला गजा पाटील म्हणून सगळ्यांसमोर पेश करतो. अर्थात, विक्रांतचं खरं रूप ईशाला कळलं आणि आता ती त्याला कसा धडा शिकवते, हेच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

SPECIAL REPORT: वाघांच्या साम्राज्यात...स्मिता गोंदकरसोबत अनोखी जंगल सफारी

First published: June 1, 2019, 9:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading