तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणा आणि पाठकबाई यांच्याबरोबर नंदिता वहिनीही तेवढीच लोकप्रिय आहे. ती खलनायिका आहे. धनश्री काडगावकर सध्या सुट्टी एंजाॅय करतेय.
धनश्री अरुणाचल आणि मेघालयाच्या दौऱ्यावर आहे. एरवी डोक्यावरून पदर घेऊन मालिकेत वावरणाऱ्या या वहिनीचं एकदम बिनधास्त लूक पाहून प्रेक्षकही चक्रावले.
धनश्रीनं मेघालयातले हे फोटो शेअर करताना कविताही शेअर केलीय. आपण लहानपणी जशी चित्र काढायचो, तशी दृश्य इथे दिसतायत, असं तिनं म्हटलंय.
मालिकेतली ही नंदिता वहिनी इथे एकदम खूश दिसतेय. पहाडावरच्या ठिकाणी जाऊन तिनं फोटो शूट केलेत आणि तिचा फॅशन सेन्सही लाजवाब दिसतोय.