घुंगट आणि लाल लेहंगा, Bridal Look मध्ये दिसली आदिती राव हैदरी, PHOTO Viral
दरम्यान शाहरुखने स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला होता. फरिदा जलाल यांच्या एका जुन्या चॅट शोमध्ये त्याने या घटनेविषयी सांगितलं होतं. तो म्हणाला, “मला आठवतंय जेव्हा या खास क्षणासाठी सगळे कुटुंबिय उपस्थित होते. त्यात काही जुन्या विचारांचे लोकही उपस्थित होते. मी त्या सगळ्यांचा आदर करतो. त्यांच्या विचारांचा आदर करतो. जेव्हा माझी एन्ट्री झाली तेव्हा सगळे माझ्याकडे पाहून बोलू लागले, हा मुलगा मुस्लिम आहे. हा गौरीचं नाव बदलणार का? गौरीचं मुसलमान होणार का?”त्यानंतर शाहरुखने सगळ्यांची फिरकी घ्यायचं ठरवलं. तो म्हणाला, “गौरीकडचे सगळे पंजाबीमध्ये बोलत होते. मी घड्याळात वेळ पाहिली, 1:15 झाले होते. मग मी एकदम गंभीर होत म्हटलं, चल गौरी बुरखा घाल. नमाजची वेळ झाली आहे. हे ऐकून गौरीचे सगळे नातेवाईत माझ्याकडे हैराण होऊन पाहू लागले. ते हैराण होते की, गौरीने नाव बदललं आहे, धर्मही बदलला आहे तर मी असं करेल का?” दरम्यान शाहरुखचा हा एक प्रँक होता. गौरी आणि शाहरुखचं 25 ऑक्टोबर 1991ला लग्न झालं होतं. त्यापूर्वी जवळपास 6 वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्यांना आता तीन मुलं देखील आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment, Shah Rukh Khan, Srk