मुंबई, 08 एप्रिल: डान्स दिवाने 3 या कार्यक्रमात होणाऱ्या धमाकेदार परफॉर्मन्समुळे या शोची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. मात्र काही दिवसांपासून या शो च्या सेटवरून धक्कादायक बातम्या समोर येक आहेत. काही दिवसांपूर्वी असं समोर आलं होतं की डान्स दिवाने 3 (Dance Deewane 3) च्या सेटवरील 18 क्रू मेंबर कोरोना पॉझिटिव्ह (18 Crew Member Tested Corona Positive) आले होते. आता अशी माहिती समोर आली आहे की, या रिअॅलिटी शोचा परिक्षक धर्मेश येलांडेला (Dharmesh Yelande Testes COVID-19 Positive) देखील कोरोनाची लागण झाली आहे.
डान्स दिवाने 3 या कार्यक्रमात माधुरी दिक्षीत (Madhuri Dixit), तुषार कालिया (Tushar Kalia) आणि धर्मेश येलांडे असे तीन परिक्षक आहेत तर राघव जुयाल (Raghav Juyal) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. धर्मेश पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या चाहत्यांसह सर्वांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार माधुरी आणि तुषार यांची कोरोना टेस्ट नेगिटिव्ह आली आहे. काही मीडिया अहवालांच्या मते, या कार्यक्रमाच्या मेकर्सनी धर्मेशला कोरोना लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येणारे काही दिवस धर्मेश या कार्यक्रमाचा हिस्सा नसेल. कारण काही दिवसांपूर्वी सोनी टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये धर्मेश दिसत नाही आहे. त्याच्याऐवजी या प्रोमोमध्ये कोरिओग्राफर पुनीत पाठक (Puneet Pathak) आणि शक्ति मोहन (Shakti Mohan) दिसत आहेत.
(हे वाचा-'क्वारंटाइन टाळण्यासाठी 10 हजारांची मागणी'; मुंबईच्या हॉटेलबद्दल गायिकेचा दावा)
ETimes TV च्या अहवालानुसार ज्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रू मेंबर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते, त्यावेळी कार्यक्रमाचे निर्माते अरविंद राव यांनी त्वरित नवीन क्रू मेंबर्सची व्यवस्था केली होती. सेट देखील सॅनिटाइझ करण्यात आला होता.
धर्मेश काही दिवसांपुर्वी घराच्या कामासाठी गोव्याला गेला होता. त्यानंतर परतल्यावर त्याची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्याला काही दिवसांसाठी रिप्लेस करण्यात आले होते. चॅनेलने जारी केलेल्या प्रोमोमध्ये त्याच्या ऐवजी पुनीत आणि शक्ति दिसले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Corona, Corona hotspot, Covid-19 positive, Mumbai