Home /News /entertainment /

बापरे! अभिषेकने बायकोला घातलं होतं एवढं महाग मंगळसूत्र; ऐश्वर्याने काही दिवसातच बदललं

बापरे! अभिषेकने बायकोला घातलं होतं एवढं महाग मंगळसूत्र; ऐश्वर्याने काही दिवसातच बदललं

अभिषेकने पत्नी ऐश्वर्याला लग्नात अतिशय महागडं मंगळसुत्र घातलं होतं. पण काहीच दिवसांत ऐश्वर्याने त्याची डिझाईन बदलली. व दुसरं मंगळसुत्र केलं होतं.

  मुंबई 4 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) एकेकाळची सुपरस्टार होती. आजही ऐश्वर्या ब्युटी विथ ब्रेन (Beauty with brain) म्हणून ओळखली जाते. पण तिच्या चित्रपटांइतकीच तिच्या लग्नाची आजही चर्चा होते. अभिषेक (Abhishek Bacchan) आणि ऐश्वर्याच्या लग्नाला आता 14 वर्षे उलटली आहेत. पण त्यांच्या लग्नावर आजही खूप बोललं जातं. अगदी धूम धडाक्यात दोघांचही लग्नं पर पडल होतं. मुंबईतील बच्चन कुटुंबाच्या एका बंगल्यावर हा शाही विवाह सोहळा रंगला होता.

  आमिर- किरणच नाही तर या सेलिब्रिटींनी ही मोडले दीर्घकाळ चाललेले संसार; पाहा कोण आहेत

  2007 साली दोघांनीही लग्नगाठ बांधली होती. एका मुलाखतीत अभिषेकने सांगितल होत की न्युयॉर्कच्या एका हॉटेलच्या गॅलरीत त्याने ऐश्वर्या ला प्रपोज केलं होतं त्यानंतर ऐश्वर्या त्याला हो म्हटली. (Aishwarya - Abhishek wedding)
  लग्नात ऐश्वर्याने तब्बल 75 लाखांची साडी परिधान केली होती. प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला यांनी ऐश्वर्यासाठी सुंदर अशी कांजीवरम साडी डिझाइन केली होती. तर अभिषेकने आपल्या पत्नी साठी तब्बल 45 लाखांचं मंगळसूत्र केलं होतं.
  अनेकदा ऐश्वर्या तेच मंगळसूत्र घालायची. दोन पदर असलेलं ते मंगळसूत्र होतं पण काहीच वर्षात ऐश्वर्याने ते मंगळसूत्र बदललं व दुसरं मंगळसूत्र केलं. एकदा तिने याविषयी सांगितल देखील होतं. ती म्हणाली होती की, आधीच मंगळसूत्र हे मोठं लांब होतं त्यामुळे मुलगी झाल्यानंतर काही प्रॉब्लेम होऊ नये तसेच ते वजनानेही जड होतं त्यामुळे ते बदलून लहान मंगळसूत्र घेतल्याचं तिने सांगीतलं होतं. ऐश्वर्या ने लग्नानंतर कुटुंबाकडे जास्त वेळ देणं पसंत केलं. तर काही चित्रपटांत ती दिसली पण आता ती पूर्णपणे चित्रपटसृष्टीपासून दूरच आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Abhishek Bachchan, Aishwarya rai, Entertainment

  पुढील बातम्या