नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : भारतात आणि जगभरात लैंगिक शोषण ही मोठी समस्या आहे. लहान मुलींचं आणि मुलांचं लैंगिक शोषण ही तर फार मोठी समस्या आहे. अनेकदा या गोष्टी बंद खोल्यांत आणि नातेवाईक, मित्रांकडून घडत असल्यामुळे त्यांच्याबद्दल कुणीही काहीही बोलत नाही. मुख्य म्हणजे सर्वसामान्य मुलीच नाही, तर अनेक अभिनेत्रींनाही या शोषणाचा त्रास सहन करावा लागला आहे. त्यांनीही त्या वयात याबद्दल आवाज उठवला नव्हता. पण नंतर त्यांनी मात्र खुलासे केले आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय टीव्ही मालिकेत बबिता अय्यर ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हिनेही काही खुलासे केले होते. मुनमुन सोशल मीडियावर खूप कार्यरत असते. ती आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी इथे उघड करते.
मुनमुनने 2017 मध्ये सोशल मीडिया पोस्टमध्ये तिच्या आयुष्यात झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रसंगांबाबत (Munmun Dutta sexual abuse) लिहिलं होतं. तिने एक मोठी नोट लिहिली होती त्यात तिने लिहिलं होतं की, हे असं काही लिहिताना ते प्रसंग मला आठवतात आणि आजही माझ्या डोळ्यांत पाणी येतं. त्या लोकांबाबत चिड येते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मला जवळ बोलवून माझ्या देहाकडे घाणेरड्या नजरेने पाहणारे आमच्या शेजारी राहणाऱ्या काकांची ती नजर आजही मला आठवली तरीही कीळस येते. त्यावर ते सांगायचे की त्यांनी जे केलंय त्याबाबत इतर कुणाला सांगू नकोस. माझा मोठा चुलत भाऊ इतक्या घाणेरड्या पद्धतीनी मला न्याहाळायचा की अजूनही त्यांचा राग येतो.
माझ्या ट्युशनमधल्या शिक्षकांनी माझ्या अंडरपँटमध्ये हात घातला होता. दुसऱ्या एका शिक्षकांना मी राखी बांधली होती, ते तर क्लासमधल्या मुलींच्या ब्राच्या स्ट्रिप ओढून मग त्यांना रागवायचे. रेल्वे स्टेशनवर एका पुरुषाने मला त्याच्याकडे ओढून घेऊन जबरदस्ती मिठी मारली होती. या सगळ्या किळसवाण्या गोष्टी आठवल्या की आजही अंगावर शहारा येतो.
तिनी पुढे लिहिलं होतं की, अशा लैंगिक शोषणाच्या घटना का घडाव्यात? तेव्हा तुम्ही खूप लहान असता तेव्हा भीतीने तुमच्या पोटात गोळा आला असेल. त्या वेळी हे सगळं आपल्या आईवडिलांना सांगायलाही तुम्हाला लाज वाटते त्यामुळे तुम्ही याबद्दल एक शब्दही न बोलता सगळं सहन करता त्यामुळे तुम्हाला पुरुषांबद्दल प्रचंड तिटकारा निर्माण होतो. तुम्हाला माहीत असतं की ते यात दोषी असतात. या प्रसंगामुळे आपला गळा दाबला जातोय असं फीलिंग (Bad Feeling) तुम्हाला येतं आणि ते आणणारे हे पुरूष असतात. असे प्रसंग, स्पर्श आयुष्यातून काढून टाकायला अनेक वर्षं लागतात. त्यामुळे मी लैंगिक शोषणाविरुद्धच्या (Sextual Abuse) आंदोलनाचा भाग झाले आहे.
त्या वेळी मला करता आलं नाही पण आताच्या घडीला जर कुणी पुरुषाने माझ्यासोबत असं वागण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला धडा शिकवेन. मी जशी आहे त्याबद्दल मला अभिमान वाटतो, असंही मुनमुनने या पोस्टमध्ये लिहिलं होतं. प्रख्यात अभिनेत्री असली तरीही तिच्याशी पण पुरुष घाणेरडं वर्तन करतात आणि लहानपणीही तिला हे भोगावं लागलं आहे हे सांगण्याचा मुनमुनचा उद्देश आहे. पण ती इतर मुलींनी, स्रियांना अशा प्रसंगांत खंबीर राहण्याचा सल्ला देते. तिच्या पोस्टमुळे बबिताचं एक वेगळं रूपच तिच्या चाहत्यांना बघायला मिळालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.