Home /News /entertainment /

Nusrat Jahanची YashdasGupta सोबत पार्टी; 'आई' झाल्याचा आनंद केला साजरा

Nusrat Jahanची YashdasGupta सोबत पार्टी; 'आई' झाल्याचा आनंद केला साजरा

सध्या नुसरत आपलं मदरहूड एन्जॉय करत आहे. अवघ्या वीस दिवसांपूर्वी नुसरतने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता.

  मुंबई, 15 सप्टेंबर- बंगाली अभिनेत्री(Bengali Actress) आणि तृणमूल काँग्रेसची(TMC) खासदार नुसरत जहाँ (Nusarat Jahan) नेहमीच आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर नुसरत नेहमीच खळबळ माजवत असते. सध्या नुसरत आपलं मदरहूड एन्जॉय करत आहे. अवघ्या वीस दिवसांपूर्वी नुसरतने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. तसेच नुसरतने ईशान असं त्याच नाव ठेवलं आहे. नुसरत आपल्या प्रेग्नेन्सीमुळे प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान ती अभिनेता आणि जवळचा मित्र यशदास(Yashdas Gupta) गुप्तासोबत एका रेस्टोरंटमध्ये डिनर घेताना दिसून आली आहे. नुकताच नुसरतची मैत्रीण असणाऱ्या उशोषी सेनगुप्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती एका रेस्टोरंटमध्ये नुसरत आणि यशदास गुप्तासोबत दिसून येत आहे. यावेळी तिघेही खूपच उत्साही दिसत आहेत. फोटोमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे. ती या ड्रेसमध्ये खूपच फिट दिसून येत आहे. नुसरतचा हा फोटो पाहून भलेभले चकित झाले आहेत. सर्वांना हाच प्रश्न पडला आहे, याच नुसरतने अवघ्या २० दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिला आहे का? कारण ती इतकी फिट दिसत आहे. प्रेग्नेन्सी दरम्यानही नुसरतने आपला फिटनेस खूपच चांगल्या पद्धतीने जपला आहे.
  नुसरत जहाँ आणि यशदास गुप्तासोबत इतरही त्यांचे मित्र डिनरसाठी उपस्थित होते. नुसरतने स्वतः आई झाल्याचा आनंद व्यक्त करत ही पार्टी दिली होती. मात्र नेहमीप्रमाणे यश आणि नुसरत यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहेत. हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुसरत जहाँ आणि यशदाससोबतचा फोटो शेअर करत उशोषीनं लिहिलं आहे, 'गॉर्जिअस, स्टनिंग, बंगालची पॉवर वुमेन माझं प्रेम नुसरत जहाँ आणि डॅशिंग यशदास गुप्तासोबत खूपच रोमांचित अनुभव होता'. (हे वाचा:हे काय केलंस' नेहा कक्करचा नवा LOOK पाहून चक्रावले युजर्स; कमेंट करत म्हणाले... ) उशोषी पुढं लिहिते, 'तुझ्या या प्रवासा तुला खूपसारे पिज्जा, डोनट, डेझर्ट्स मिळूदे ही इच्छा. तू आईचा प्रवास खूप सुंदर बनवला आहेस. तुला खूप सारं प्रेम'. असं कॅप्शन लिहीत उशोषीने मोठ्या प्रमाणात ईमोजीसुद्धा शेअर केल्या आहेत. तिची हि पोस्ट आणि नुसरत जहाँ-यशदास गुप्ताचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (हे वाचा:फक्त 5 हजार 500 रुपयांवर मुंबई गाठणारा सोनू आज आहे तब्बल इतक्या कोटींचा मालक) नुसरत गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या लग्नाबद्दल चर्चेत होती. तिने अचानक आपलं लग्न वैध नसल्याचं सांगत खळबळ माजवली होती. तिच्या मते तिने पती निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये लग्न केलं होतं. त्यामुळे तिच्या मते हे लग्न भारतात मान्यच नाही त्यामुळे तिचा आणि निखिलचा घटस्फोट होण्याचा संबंधच येत नाही असं तिचं मत होतं. गेल्या खूप दिवसांपासून ती आपल्या पतीपासून विभक्त होती. दरम्यान यशदास गुप्तासोबत तिचं अफेयर असल्याचं म्हटलं जात आहे. आणि अशातच नुसरतने एका मुलाला जन्म दिला आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Actress, Entertainment, TMC

  पुढील बातम्या