Home /News /entertainment /

'हे काय केलंस' नेहा कक्करचा नवा LOOK पाहून चक्रावले युजर्स; कमेंट करत म्हणाले...

'हे काय केलंस' नेहा कक्करचा नवा LOOK पाहून चक्रावले युजर्स; कमेंट करत म्हणाले...

नेहा कक्करने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहा कक्करने प्रसिद्ध अमेरिकन रॅपर कार्डी बी सारखा लुक केला आहे.

  मुंबई, 16 सप्टेंबर- बॉलिवूड (Bollywood Singer) गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. ती सतत आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात.  मात्र यावेळी उलट चित्र पाहायला मिळत आहे. नेहाचा नवा लुक(Cardi B Look) तिच्या चाहत्यांना अजिबात पसंत पडलेला नाही.
  यावरून तिची खिल्ली उडवली जात आहे. नेहा कक्करने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहा कक्करने प्रसिद्ध अमेरिकन रॅपर कार्डी बी सारखा लुक केला आहे. यामध्ये नेहाने पिंक ऑफ शोल्डर टॉप आणि पॅरोट ग्रीन रंगाचा स्कर्ट घातला आहे. तसेच केसांचा पांढरा विग घातला आहे. या सर्व पोशाखात नेहा खूपच वेगळी दिसत आहे. (हे वाचा:फक्त 5 हजार 500 रुपयांवर मुंबई गाठणारा सोनू आज आहे तब्बल इतक्या कोटींचा मालक) नेहाने हे फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. तसेच त्यावर संमिश्र प्रतिक्रियासुद्धा येत आहेत. यामध्ये युजर्सनी कमेंट्स करत नेहाची खिल्ली उडवली आहे. एका युजरने कमेंट् करत म्हटलं आहे, 'हे काय केलंस ताई', तर दुसऱ्या युजरने म्हटलं आहे, 'कार्डी बी नव्हे तर छपरी दिसत आहेस'. आणखी एकाने 'घाबरवलंस ' असं म्हटलं आहे. तर नेहाच्या चाहत्यांनी तिला सपोर्ट केला आहे. नेहाचा हा लुक सध्या तरी फ्लॉप झालेला दिसत आहे. (हे वाचा:Shahrukh Khan सोबत झळकणार साऊथ स्टार नयनतारा; Lion मधून येणार एकत्र) नुकताच नेहा कक्करचा 'कांटा लगा' गे गाणं रिलीज झालं आहे. मात्र काही युजर्सनि या गाण्याचीदेखील खिल्ली उडवली आहे. काही दिवसांपूर्वी नेहा कक्करचं आणखी एक गाणं आलं होतं. ते गाणं बिग बॉस 14 फेम कपल जस्मिन भसीन आणि अली गोनीवर चित्रित करण्यात आलं होतं. तसेच नेहाने हा लुक आपल्या 'कांटा लगा' या गाण्यासाठीच घेतला होता.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Neha kakkar

  पुढील बातम्या