• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Big B यांनी Black सिनेमासाठी घेतलं नव्हतं मानधन, संजय लीला भन्साळी होते कारण

Big B यांनी Black सिनेमासाठी घेतलं नव्हतं मानधन, संजय लीला भन्साळी होते कारण

अमिताभ बच्चन आणि संजय लीला भन्साळी (फोटो सौजन्य- फिल्मफेअर)

अमिताभ बच्चन आणि संजय लीला भन्साळी (फोटो सौजन्य- फिल्मफेअर)

चेहरे (Chehre) सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांनी कोणतंही मानधन घेतलं नाही आहे. या सिनेमाची कहाणी हे यामागचं कारण आहे. दरम्यान याआधी बच्चन यांनी ब्लॅक या सिनेमासाठी मानधन घेण्यास नकार दिला होता..

 • Share this:
  मुंबई, 29 ऑगस्ट: महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रत्येक भूमिका बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण करतात. त्यांचे नवनवे चित्रपट देखील प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. दीर्घकाळापासून Big B बॉलिवूडमध्ये सक्रिय असल्याने त्यांचे फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. अलीकडेच त्यांचा 'चेहरे' (Chehre) हा सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची आणि समिक्षकांची वाहवा मिळवत आहे. या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांनी कोणतंही मानधन घेतलं नाही आहे. या सिनेमाची कहाणी हे यामागचं कारण आहे. चेहरे सिनेमाबाबत बोलायचं झालं तर या सिनेमाची कहाणी बच्चन यांनी इतकी आवडली की त्यांनी मानधन घेण्यास नकार दिला. शिवाय त्यांनी पोलंड याठिकाणच्या प्रवासाचा खर्च देखील स्वत:च केला. मात्र प्रोड्यूसर आनंद पंडित यांनी अलीकडेच अशी माहिती दिली आहे की टॅक्स रीझन्समुळे अमिताभ यांना पेमेंट करण्यात आलं आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासह इम्रान हाश्मी, रिया चक्रवर्ती, अन्नू कपूर अशी स्टारकास्ट आहे.
  दरम्यान हे पहिल्यांदा नाही की अमिताभ बच्चन यांनी सिनेमासाठी मानधन घेतलेलं नाही. याआधीही एका सिनेमासाठी त्यांनी कोणतंच मानधन आकारलं नव्हतं. हा सिनेमा म्हणजे 'ब्लॅक'. या सिनेमात बच्चन यांनी राणी मुखर्जीसह स्क्रीन शेअर केली होती. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रीय पुरस्कार देखील जिंकला होता.
  अमिताभ बच्चन यांना दीर्घ काळापासून संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्याबरोबर काम करायचं होतं. त्यामुळे जेव्हा त्यांना ही संधी मिळाली तेव्हा त्यांनी फी घेण्यास नकार दिला होता. अमिताभ बच्चन यांना स्वत: ही गोष्ट शेअर केली होती. 2017 मध्ये 'ब्लॅक'ला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी या घटनेचा उल्लेख केला होता. त्यांनी यामध्ये असे देखील म्हटले होते की, या सिनेमाच्या प्रीमियरसाठी दिलीप कुमार साहब देखील उपस्थित होते. ही बाब बालपणीचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखी होती, असंही अमिताभ बच्चन यावेळी म्हणाले होते.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: