मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Nora Fatehi ला हवाय असा Life partner; पाहा तुमच्यात ते गुण आहेत का?

Nora Fatehi ला हवाय असा Life partner; पाहा तुमच्यात ते गुण आहेत का?

एका रिअॅलिटी शोमध्ये नोरा फतेहीने (Nora Fatehi) तिला नेमका कसा नवरा हवा, याचा खुलासा केला आहे.

एका रिअॅलिटी शोमध्ये नोरा फतेहीने (Nora Fatehi) तिला नेमका कसा नवरा हवा, याचा खुलासा केला आहे.

एका रिअॅलिटी शोमध्ये नोरा फतेहीने (Nora Fatehi) तिला नेमका कसा नवरा हवा, याचा खुलासा केला आहे.

  मुंबई, 28 डिसेंबर : आतापर्यंत अनेक परदेशी कलाकारांनी भारतात येऊन बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपलं नशीब आजमवलं आहे. यामध्ये कतरिना कैफ, नर्गिस फाखरी, फवाद खान अशा अनेक कलाकारांचा समावेश होतो. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. हे नाव आहे कॅनेडियन अॅक्टर आणि डान्सर नोरा फतेहीचं (Nora Fatehi). बॉलिवूडची डान्सिंग क्वीन अशी ओळख नोराला मिळाली आहे. सध्या नोरा आपल्या म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून, त्यासाठी ती विविध रिअॅलिटी शोमध्ये उपस्थित राहत आहे. अशाच एका कार्यक्रमादरम्यान नोरानं आपल्याला जोडीदार (Nora Fatehi life partner) कसा हवा, याबाबत माहिती दिली आहे.

  नोरा फतेही अद्याप सिंगल आहे.  काही दिवसांपूर्वी नोरा फतेही आणि गायक गुरू रंधावा यांचे गोव्यातले फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चादेखील सुरू झाल्या होत्या. 'इंडियाज बेस्ट डान्सर' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये (India's Best Dancer) तिला तिच्या जोडीदाराबाबात प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा तिनं आपल्या भावी जोडीदाराबाबत काही गोष्टींचा खुलासा केला. तिला कसा मुलगा आवडतो आणि त्याच्या अंगी कोणते गुण असावेत, याचीदेखील तिने माहिती दिली. नोराचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

  हे वाचा - चालता चालताच मलायकाचा ढासळला तोल; Video Viral होताच झाली ट्रोल

  जो मुलगा क्रिएटिव्ह (Creative) असेल आणि ज्याला आपलं स्केच (Sketch) काढता येत असेल, त्याला ती आपला जोडीदार बनवण्यास तयार असल्याचं तिनं म्हटलं आहे. त्यानंतर शोच्या सेटवर मोठ्या प्रमाणात मस्ती करण्यात आली. नोराचं उत्तर ऐकून रिअॅलिटी शोचे जज टेरेन्स लुईस (Terence Lewis) आणि गायक गुरू रंधावा (Guru Randhawa) यांनी लगेच नोराचं स्केच रेखाटण्यास सुरुवात केली. यामुळे उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

  'बिग बॉस' या रिअॅलिटी शोपासून (Big Boss) नोराने (Nora Fatehi Career) या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर तिनं अनेक म्युझिक व्हिडिओंजमध्ये काम केलं आहे. यामध्ये 'दिलबर', 'गर्मी', पछताओगे यांसारख्या हिट गाण्यांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी ती 'छोड़ देंगे' या गाण्यात दिसली होती. याशिवाय तिनं गुरू रंधावासोबत 'नच मेरी रानी' गाण्यातही आपली डान्सिंग स्किल्स दाखवली होती. आता त्याच गाण्याचा दुसरा भाग असलेल्या 'डान्स मेरी रानी'मध्ये ती पुन्हा दिसत आहे.

  हे वाचा - कुणी गेलं जेलमध्ये तर कुणी झालं ट्रोल; पाहा कसं गेलं सेलिब्रिटींचं 2021 वर्ष

  नुकताच नोरा फतेहीचा 'डान्स मेरी रानी' (Dance Meri Rani) नावाचा म्युझिक व्हिडिओ (Music Video) रिलीज झाला आहे. या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नोरानं आपली डान्सिंग स्किल्स दाखवली आहेत. तिच्या चाहत्यांनाही हा व्हिडिओ खूप आवडला आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये नोरानं आपल्या डान्ससोबतच सौंदर्याची जादूही पसरवली आहे.  कमालीची बेली डान्सर (Belly dancer) असलेल्या नोराला मोठं फॅन फॉलोइंग आहे. तिच्या प्रत्येक डान्स मूव्हचे चाहते अक्षरश: 'दीवाने' आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Entertainment, Nora fatehi