Home /News /entertainment /

काय? महेश बाबूच्या भावाला बायकोनं चपलेनं मारलं! VIDEO होतोय व्हायरल

काय? महेश बाबूच्या भावाला बायकोनं चपलेनं मारलं! VIDEO होतोय व्हायरल

महेश बाबू त्याचा भाऊ (Mahesh babu brother)नरेश बाबूमुळे चर्चेत आहे. परिणामी महेश बाबूचा सावत्र भाऊ नरेश बाबूला त्याच्या पत्नीनं मारहाण (Mahesh Babu's brother Naresh Babu was beaten by his wife) केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

  मुंबई, 5 जुलै : प्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू (South superstar mahesh babu)नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला पहायला मिळतो. अशातच पुन्हा एकदा तो चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र यावेळी त्याच्या चर्चेत येण्याचं कारण काहीसं वेगळं आहे. महेश बाबू त्याचा भाऊ (Mahesh babu brother)नरेश बाबूमुळे चर्चेत आहे. नरेश बाबू (Naresh babu)आणि त्यांची तिसरी पत्नी रम्या रघुपती (Ramaya raghupati) यांचे संबंध चांगले नसून त्यांच्यांत काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. परिणामी महेश बाबूचा सावत्र भाऊ नरेश बाबूला त्याच्या पत्नीनं मारहाण (Mahesh Babu's brother Naresh Babu was beaten by his wife) केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर नरेश बाबू आणि त्याची पत्नी रम्या रघुपतीचा व्हिडीओ (Social media viral video)मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हाॅटेलमध्ये राहणाऱ्या नरेशला तिसरी पत्नी रम्यानं चपलीनं मारहाण केली. तिनं हाॅटेलमध्ये आरडाओरडाही केला.  यावेळी अनेक पोलीसही हस्तक्षेप करताना दिसून आले. यादरम्यानचा व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हेही वाचा  -  Big Bossसाठी मालिका सोडली, पण आता पश्चाताप....; आदिशनं केला खुलासा नरेश हा चौथ्या लग्नाच्या तयारीत असल्याच्या चर्चा होत आहेत. यातच तो हाॅटेलमध्ये अन्य स्त्रीसोबत दिसला. त्यामुळे रम्याला राग अनावर झाला आणि तिनं मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी येऊन परिस्थितीला आवरलं. एवढंच नाही तर नरेशही रम्यावर ओरडताना दिसला. दोघांमधील भांडण पाहून लोकही आश्चर्यचकित झाले. त्यांच्यातील अडचणी खूप वाढल्या असून खूप दुरावा आल्याचं पहायला मिळतंय. दोघांमध्ये आता प्रेम उरलं नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
  59 वर्षीय नरेशचं अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत (Naresh & pavitra lokesh affair)अफेअर असल्याच्या आरोप आहे. मात्र नरेश आणि पवित्रा दोघांनीही या अफवा असल्याचं म्हटलं आहे. नरेशच्या म्हणण्यानुसार, त्याने पत्नी रम्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती, त्यानंतर ती माझी बदनामी करण्यासाठी अशा खोट्या बातम्या पसरवत आहे. दरम्यान, नरेश हे तेलुगू चित्रपटांचे सुपरस्टार महेश बाबू यांचे सावत्र भाऊ आहेत. नरेश हा दिवंगत अभिनेत्री विजया निर्मला आणि त्यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. नंतर विजयाने महेश बाबूचे वडील आणि अभिनेता कृष्णा यांच्याशी लग्न केले. यातच नरेश या त्याच्या तिसऱ्या पत्नीनं केलेल्या मारहाणीमुळे चर्चेत आला आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Mahesh babu, South film

  पुढील बातम्या