जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहा एका क्लिकवर

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहा एका क्लिकवर

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहा एका क्लिकवर

आता हेच पाहा ना.. उर्वशीच एका व्हिडिओने तर सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,19 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेल ही तिच्या वेगवेगळ्या अंदामुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. त्यात ती नियमितपणे तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. चाहते तिचे व्हिडिओ पाहून प्रतिक्रियाही देतात. आता हेच पाहा ना.. उर्वशीच एका व्हिडिओने तर सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तिचा डान्स पाहून तर अनेक चाहते घायाळ झाले आहेत. उर्वशीबाबत सांगायंच झाल्यास ती अभिनयापेक्षा डान्समुळेच प्रसिद्ध आहे. तिचे डान्स धमाकेदार असतात. उर्वशीने तिच्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे. धमाकेदार डान्सचा व्हिडिओ काही तासांतच व्हायरल झाला. आतापर्यंत 3 लाखांहून जास्त चाहत्यांनी उर्वशीचा डान्स पाहिला आहे. उर्वशीच्या या व्हिडिओला तिचे चाहते चांगलीच दाद देत आहेत. चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्वशी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी 30 लाख रुपये घेते, अशी चर्चा आहे. उर्वशीने ‘सिंह साब दी ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. तसेच उर्वशीने वयाच्या 15 वर्षीच मॉडलिंग सुरु केले होते. तिने मिस यूनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर तिने हनी सिंगसोबत ‘लव्ह डोस’ या म्यूझिक व्हिडिओमध्ये काम केलं होतं. हे सॉंग देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात