मुंबई, 02 फेब्रुवारी : अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारं कपल आहे. सध्या हे दोघंही त्यांचा आगामी सिनेमा लव्ह आज कलच्या प्रमोशनमध्ये बीझी आहेत. पण या सिनेमापेक्षा जास्त चर्चा होतेय ती या दोघांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीची. हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत. मध्यंतरीच्या काळात या दोघांच ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये जवळीक पाहायला मिळत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत साराला कार्तिकसोबतच्या नात्याविषयी विचारण्यात आलं. त्यावेळी बोलताना तिनं कार्तिकसोबतच्या रिलेशनशिपबाबत अजब खुलासा केला. लव्ह आज कलच्या प्रमोशनसाठी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत साराला तु कार्तिकला डेट करतेस का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सारा म्हणाली, ‘हो मी कार्तिकला डेट करते पण या सिनेमामध्ये. मी रिअल लाइफमध्ये कार्तिकला डेट करत नाही. तुम्ही आमची केमिस्ट्री 14 फेब्रुवारीला सिनेमागृहात पाहू शकता.’ नागिन फेम अभिनेत्रीचा BOLD लुक, बिकिनी फोटोशूट सोशल मीडियावर VIRAL
सारानं करण जोहरच्या चॅट शोमध्ये कार्तिक आर्यनवर क्रश असल्याचं मान्य केलं होतं. त्यानंतर अभिनेता रणवीर सिंहनं या दोघांची एका फंक्शनमध्ये ओळख करुन दिली होती. त्यानंतर त्यांच्यातील मैत्री वाढली आणि या जोडीची वाढती लोकप्रियता लक्षात घेत इम्तियाज अली यांनी त्याच्या लव्ह आज कलसाठी या दोघांना साइन केलं. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान या दोघांमधील जवळीक वाढलेली दिसली. मात्र काही दिवसांनंतर कार्तिकनं स्वतःच मला साराचा बॉयफ्रेंड म्हणू नका अशी विनंती पॅपराजीला केली होती तसेच दोघांचे एकत्र फोटो काढण्यासाही मनाई केली होती. Fast & Furious 9: जॉन सीना भिडणार विन डिजलला, श्वास रोखून धरणारा धमाकेदार ट्रेलर
सारा अली खान आणि कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा 2009 मध्ये दीपिका आणि सैफच्या लव्ह आज कलचा सिक्वेल आहे. दरम्यान लेकीच्या या सिनेमाच्या ट्रेलरवर सैफनं फारशी चांगली प्रतिक्रिया दिली नव्हती. मुलीच्या सिनेमापेक्षा आपलाच सिनेमा जास्त चांगला असल्याचं सैफनं म्हटलं होतं. त्यामुळे या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये अद्याप उत्सुकता कायम आहे. हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हेलेंटाइन डे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं आहे. तिसऱ्या पिढीतली ही अभिनेत्री HOT फोटोशूटमुळे चर्चेत, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

)







