जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कुशल बद्रिकेची मराठी सोडून गुजराती भाषेत पोस्ट करण्यामागं काय आहे कारण?

कुशल बद्रिकेची मराठी सोडून गुजराती भाषेत पोस्ट करण्यामागं काय आहे कारण?

कुशल बद्रिकेची मराठी सोडून गुजराती भाषेत पोस्ट करण्यामागं काय आहे कारण?

कुशलनं नुकताच त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे त्याने या फोटोला गुजरातीमध्ये कॅप्शन देखील दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 जून- मागच्या काही दिवसांपासून अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय झाला आहे. नेहमी आपल्या विनोदाने लोकांना पोटभरून हासायला लावणारा कुशल सोशल मीडियावर नेहमीच लक्षवेधी पोस्ट करत असतो. त्याच्या प्रत्येक पोस्टमधून तो काहींना काही सांगण्याचा व मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कुशलनं नुकताच त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे त्याने या फोटोला गुजरातीमध्ये कॅप्शन देखील दिली आहे. त्याचं गुजरातीमध्ये कॅप्शन देण्यामाग देखील एक खास कारण आहे हे फोटो पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. कुशल बद्रिके गुजरातला गेला होता. तेथील तापी नदीवर फोटो पोस्ट करत कुशल म्हणतो की,हुं सुरत माटा गयवानू होतू , थवे तापी नदी ना माटा फोटू खिचवानी गयवा सू , तवाना पोज.(तशी गुजराती पण सोप्पी आहे यार…. ) त्याचं हे गुजाराथी भाषेवरचं प्रेम पाहून चाहत्यांनी या पोस्टवर भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका चाहत्यांने म्हटलं आहे की, (खूपच छान, सर!! .. खुब सरस फोटो आवी गयों, मोठा भाय!!) तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, पुन्हा पुन्हा सुरतच्या दवऱ्यावर या, म्हणजे तुम्हाला गुजराती पण येईल___❤️ कशी वाटली तुम्हाला आमची सुरत❤️ तर आणखी एकानं म्हटलं आहे की, फोटो मराठी मध्येच छान वाटतोय..अशा भन्नाट कमेंट कुशलच्या या पोस्टवर आल्या आहेत.

जाहिरात

कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नेहमी तो भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतो. पांडू सिनेमाच्या सेटवरली देखील त्याने काही व्हिडिओ शेअर केले आहेत. शिवाय तो चला हला येऊ द्याच्या सेटवरून कधी भाऊ कदम तर कधी श्रेया बुगडेसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे.तसेच कुशल सध्या चित्रपटांमध्येसुद्धा व्यग्र आहे. तो लवकरच ‘जत्रा 2’ मध्ये धम्माल करताना दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात