Home /News /entertainment /

Nipun Dharmadhikari: शूटिंग संपवून निपुणला लागले घरी जायचे वेध, लेकीचा क्यूट व्हिडीओ शेअर करत म्हणाला,

Nipun Dharmadhikari: शूटिंग संपवून निपुणला लागले घरी जायचे वेध, लेकीचा क्यूट व्हिडीओ शेअर करत म्हणाला,

‘मी वसंतराव’ (Mee Vasantrao) सिनेमातून नावारूपाला आलेला दिग्दर्शक नुकतंच त्याच्या बॉलिवूड फिल्मचं पहिलं शेड्युल संपवून घरी यायला निघाला आहे. त्याला सध्या अशा गोष्टींचे वेध लागले ते बघून तुम्हाला नक्कीच आनंद होईल.

  मुंबई 4 जुलै: निपुण धर्माधिकारी (Nipun Dharmadhikari) सध्या कंबर कसून त्याच्या बॉलिवूड डेब्यू साठी (Nipun Dharmadhikari bollywood debut) काम करताना दिसत आहे. त्याच्या ‘इश्क विश्क rebound’ (Ishq Vishk) या पहिल्या वहिल्या बॉलिवूड सिनेमाचं नुकतंच शेड्युल wrap झालं असून निपुण आता लवकरच त्याच्या मुलीला भेटायला येणार आहे. निपुणची आतुरता एवढी वाढली आहे की त्याने त्याच्या मुलीचा (Nipun Dharmadhikari daughter) एक खास विडिओ शेअर केला आहे. निपुण हा 2020 मध्ये बाबा झाला असून तो आणि त्याची पत्नी संहिता यांना विहा नावाच्या मुलगी आहे. निपुण आणि संहिता यांच्या मॅरेज अनिव्हर्सरीला एक खास फोटो टाकून त्यांनी या नव्या पाहुणीचं स्वागत केलं होतं. निपुण कायमच लेकीचे गोंडस विडिओ शेअर करत असतो. आज सुद्धा अशाच एका व्हिडिओची बरीच चर्चा होताना दिसत आहे. निपुणची लेक आता तोडकं मोडकं का होईना पण हळूहळू बोलायला शिकतेय. बाळांचे पहिले वहिले शब्द कधी आई कधी बाबा असे असतात पण निपुंची लेक मात्र बाबांच्या प्रश्नाला मस्त उत्तरं देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये निपुण लेकीला विचारतो ‘विहा काय झालं?’ तर त्याची लेक गोड आवाजात आणि बोबड्या स्वरात ‘काही नाही’ असं म्हणताना दिसतेय. हे ही वाचा- Kaali Poster Controversy: कालीमातेच्या तोंडात सिगरेट अन् हातात LGBT चा झेंडा, चित्रपटाच्या पोस्टरने नेटकरी संतप्त या व्हिडिओला कॅप्शन देत निपुण असं लिहितो, “तुमचा सोमवारचा दिवस थोडासा उत्तम करायचा हा प्रयत्न… मला (न) विचारल्याबद्दल धन्यवाद पण माझा मंडे एकदम मस्त चालू आहे. कारण एका महिन्याच्या मोठ्या शूटिंग शेड्युलनंतर लवकरच मी घरी जाऊन विहा आणि तिच्या ब्युटीफुल आईची भेट घेणार आहे.”
  निपुणच्या मुलीचा हा विडिओ सगळ्या चाहत्यांचा लक्ष वेधून घेताना दिसत आहे. निपुणने वारंवार सांगितलं आहे की काम करताना त्याला एकाच गोष्टीची खंत वाटते की तो सतत मुलीच्या जवळ राहून तिला मोठं होताना बघू शकत नाही. पण निपुण मुलीसोबतचा वेळ एकदम एन्जॉय करताना दिसतो. निपुण गेले काही दिवस उत्तराखंड मध्ये आपल्या पहिल्या बॉलिवूड फिल्मचं चित्रीकरण करत होता. 2003 मध्ये आलेल्या ‘इश्क विश्क’ चित्रपटाचं यंग जनरेशनसोबतचं नवं व्हर्जन अर्थात ‘इश्क विश्क rebound’ घेऊन तो येत्या काळात समोर येणार आहे. निपुण सध्या वर्क फ्रंटवर मस्त बॅटिंग करताना दिसत आहे. ‘मी वसंतराव’ सिनेमाच्या यशानंतर आता चाहते त्याला बॉलिवूडमधला एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून पाह्यला उत्सुक झाले आहेत.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Bollywood, Director, Marathi entertainment

  पुढील बातम्या