जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kaali Poster Controversy: कालीमातेच्या तोंडात सिगरेट अन् हातात LGBT चा झेंडा, चित्रपटाच्या पोस्टरने नेटकरी संतप्त

Kaali Poster Controversy: कालीमातेच्या तोंडात सिगरेट अन् हातात LGBT चा झेंडा, चित्रपटाच्या पोस्टरने नेटकरी संतप्त

Kaali Poster Controversy: कालीमातेच्या तोंडात सिगरेट अन् हातात LGBT चा झेंडा, चित्रपटाच्या पोस्टरने नेटकरी संतप्त

निर्मात्या लीना मणिमेकीलई (leena manimekalai) यांच्या एका नव्या डॉक्युमेंट्री पोस्टरमुळे सध्या एका नव्या वादाचा जन्म होताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 4 जुलै: बॉलिवूड सिनेमांमधून हिंदू देवदेवतांना निशाणा साधल्यानं अनेक वादांना तोंड फुटलं आहे. सध्या असाच एक नवा वाद उदयाला येण्याचं चित्र दिसत आहे. निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या ‘काली’ (Kaali Poster Controversy) या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरने हा वाद सुरु झाला आहे. या माहितीपटाचं पोस्टर वादजन्य असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसतेय. अनेकांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री महित शाह यांना ट्विट मध्ये टॅग करून संबंनधत व्यक्तींच्या अटकेची मागणी केली आहे. लीना यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये (Kaali documenatry) कालीमातेचे रूपात एक अभिनेत्री दिसत असून तिच्या एका हातात सिगरेट दिसतेय तर दुसऱ्या हातात LGBTQ समुदायाचा झेंडा घेतलेला दिसत आहे. या पोस्टरवरून सध्या नवा वाद सुरु झाला असून लीना यांच्या अटकेची मागणी होत आहे. लीना (leena manimekalai) यांनी 2 जुलैला आपल्या माहितीपटाचं हे पोस्टर ट्विटरवर शेअर केलं होतं. ज्यात कालीमातेचं रूप घेतलेल्या अभिनेत्रीच्या तोंडात सिगरेट दिसत आहे तसंच समलैंगिकतेचं प्रतीक असणारा झेंडा सुद्धा दिसतोय. हे पोस्टर पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.

जाहिरात

एका युजरने कमेंट करून असं म्हणलं आहे, “दररोज हिंदू धर्माला अशा पद्धतीनं मालिन केलं जात आहे. सरकार आमच्या सहनशीलतेची परीक्षा घेतंय का?” तर दुसऱ्या युजरने “लीना यांनी हिंदू देवता कालीमातेला सिगरेट पिताना दाखवलं आहे याने अनेक हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. ही अत्यंत निंदनीय बाब आहे.”

“मा. लीना जी आपण व आपल्या बुद्धिमान टीमने हे पोस्टर प्रदर्शित करून माझ्या सनातनी माँ काली देवीचा अपमान केला आहे. कृपया हे पोस्टर दिलीत करण्यात यावं नाहीतर आपल्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येईल” असं एक युजर लिहितो.

जाहिरात

अनेकदा सिनेमांवरून भावना दुखवाल्याचा वाद होताना दिसतो. अनेक स्टॅन्डअप कॉमेडियन पासून मोठमोठ्या अभिनेत्यांचे अनेक प्रोजेक्ट आजपर्यंत वादंग ठरले आहेत. असंच काहीसं लीना यांच्या डॉक्युमेंट्री फिल्ममुळे झाल्याचं समोर आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात