जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Nilesh Sable Birthday: निलेश साबळेनं ज्युनियर आर्टिस्ट म्हणून खाल्ला होता मार, आज कमवतो चिक्कार पैसे!

Nilesh Sable Birthday: निलेश साबळेनं ज्युनियर आर्टिस्ट म्हणून खाल्ला होता मार, आज कमवतो चिक्कार पैसे!

Nilesh Sable Birthday: निलेश साबळेनं ज्युनियर आर्टिस्ट म्हणून खाल्ला होता मार, आज कमवतो चिक्कार पैसे!

चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाचं गेली अनेक वर्ष सातत्याने सूत्रसंचालन करणारा डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) आपला सदतिसावा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या स्ट्रगलच्या काळातल्या काही आठवणी त्याने शेअर केल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 29 जून: नमस्कार मंडळी…. हसताय ना.. हसायलाच पाहिजे… असं म्हणत जो खणखणीत आवाजात आणि हसतमुख चेहऱ्याने प्रेक्षकांचं स्वागत करतो असा महाराष्ट्राचा लाडका निवेदक निलेश साबळे (Nilesh Sable) आपला सदतिसावा वाढदिवस आज (Nilesh Sablebirthday) साजरा करत आहे. आधी फु बाई फु आता (Who is hosting Chala Hawa Yeu Dya show) चला हवा येऊ द्या अशा यशस्वी वोंडी कार्यक्रमाचं सूत्रसंचलन एकदम सॉलिड पद्धतीने करणारा निलेश एकेकाळी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करायचा आणि त्यावेळी त्याने बेदम मार सुद्धा खाल्ला होता, हे तुम्हाला माहित आहे का? निलेश हा एक आयुर्वेदाचार्य आहे. त्याचं डॉक्टरकीचं शिक्षण झालं आहे. या इंडस्ट्रीत 2010 साली ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ कार्यक्रम जिंकत त्याने पाऊल टाकलं आणि कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्याला आधीपासूनच अभिनयच शौक होता. त्याने भाडीपा च्या ‘Ready To Lead’ या कार्यक्रमात आपला प्रवास सांगत अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. निलेशने डॉक्टरकीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली होती. पण तिथे कोणत्याच पद्धतीने नाटकाचा गंध नव्हता. “मी कॉलेजमध्ये गेल्यावर मला लक्षात आलं की इथे नाट्यमय वातावरण नाही. इथे नाटक, अभिनय याबद्दल कोला गंधही नाही. तेव्हा माझ्या वडिलांची भोर येथे बदली झाली होती. तेव्हा भोरच्या वाड्यात शॉटिंग व्हायचं म्हणून मी तासंतास त्या वाड्याबाहेर उभं राहायचो, की आता मला आत जायला मिळेल. अनेकदा मी बाहेरच्या सिक्युरिटीला विनवणी करायचो तिथेच उभा राहायचो. शेवटी एकदाचं मला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून रोल मिळाला. मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून गेलो तर मला रोल मध्ये फक्त चाबकाचे फटके खायचे होते. पण मला त्याच काहीच वाटत नव्हतं. मी जे आजवर स्वप्न बाळगलं होतं ते पूर्ण होणार होतं. ज्यांना एवढे दिवस जवळून पाहायचं होतं ते मला पाहता येणार होतं म्हणून मी आनंदी होतो.” असं निलेश या मुलाखतीत सांगतो.

एकेकाळी चाबकाचे फटके खाणारा, ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करणारा निलेश आज जवळपास लाखभरापेक्षा जास्त मानधन हवा येऊ द्याच्या एका एपिसोडसाठी घेतो अशी माहिती मिळते. निलेश एका एपिसोडचे जवळपास सव्वा लाख रुपये घेतो असं सुद्धा सांगितलं जातं. हे ही वाचा-  Amruta Deshmukh: मोस्टली सेन नंतर आता पुण्याची टॉकरवडी सांगतेय प्रोटेक्शन वापरण्याचे फायदे!

 निलेश गेली सात व्र्हस्न्पेक्षा जास्त काळ चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचं दिग्दर्शन आणि सुत्रसंचलन करत आहे. अनेकदा तो नागराज मंजुळे. मा. राज ठाकरे यांच्या भूमिका सुद्धा स्किटमध्ये अगदी लीलया पेलतो. निलेश विनोदवीरांची एक अख्खी फौज अविरतपणे सांभाळतो आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात