'भाग्यश्रीला पकड आणि KISS कर...' फोटोग्राफरनं सलमानला सांगितलं, पण...

'भाग्यश्रीला पकड आणि KISS कर...' फोटोग्राफरनं सलमानला सांगितलं, पण...

सलमान खाननं त्याच्या पहिल्या सिनेमापासून दिग्ददर्शकांसमोर नो किसिंग सीनची अट ठेवली होती. ज्यावर तो आज इतक्या वर्षांनंतरही कायम आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मे : सलमान खान आणि भाग्यश्री यांचा डेब्यू सिनेमा 'मैंने प्यार किया' एक सुपरहिट सिनेमा ठरला. भाग्यश्री आणि सलमान या सिनेमातून सिल्व्हर स्क्रिनवर एकदाच झळकले. मात्र चाहते आजही या जोडीला विसरले नाहीत. या सोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सलमान खाननं त्याच्या पहिल्या सिनेमापासून दिग्ददर्शकांसमोर नो किसिंग सीनची अट ठेवली होती. ज्यावर तो आज इतक्या वर्षांनंतरही कायम आहे.

'मैंने प्यार किया' सिनेमाच्या संपूर्ण शूटिंगमध्ये सलमानकडे किसिंग सीन मागण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. मात्र सिनेमाच्या प्रमोशन वेळी एक अजब किस्सा घडला होता. प्रमोशनच्यावेळी एका फोटोग्राफरनं सलमानला भाग्यश्रीला किस करण्यास सांगितलं होतं. कदाचित त्या फोटोग्राफरला असा फोटो हवा होता ज्यात सलमान आणि भाग्यश्री एकमेकांना किस करताना दिसतील.

View this post on Instagram

Subah ki coffee aur sooraj!

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

एक न्यूज पोर्टलशी बोलताना भाग्यश्रीनं स्वतः या गोष्टीचा खुलासा केला. त्या फोटोग्राफरनं स्पष्ट शब्दात सलमानला असं सांगितलं की, 'भाग्यश्रीला पकड आणि किस कर' त्यावेळी तो फोटोग्राफर सलमान खूप जवळ उभा होता. आणि दुसऱ्या बाजूला भाग्यश्री सलमानच्या एकदम जवळ उभी होती. ही गोष्ट ऐकल्यावर ती खूप हैराण झाली. हा एक असा क्षण होता जेव्हा तिला असुरक्षित वाटत होतं.

भाग्यश्री म्हणाली, 'त्यावेळी मी खूप घाबरले होते पण मला त्यावेळी खूप बरं वाटलं जेव्हा सलमाननं त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. सलमाननं त्याला सांगितलं की असं करण्याआधी तू भाग्यश्रीची परवानगी घे. तेव्हा मला या गोष्टीची जाणीव झाली की सलमान कितीही लोकांमध्ये असला तरीही तो प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेचा काळजी घेतो आणि त्यांचा सन्मान करतो.' अर्थात या सिनेमानंतर भाग्यश्री सिनेमांना रामराम केला.

First published: May 26, 2020, 10:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading