मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Davido | कोट्यवधींची संपत्ती असलेला 'हा' सेलेब्रिटी चाहत्यांकडे का मागतोय पैसे?

Davido | कोट्यवधींची संपत्ती असलेला 'हा' सेलेब्रिटी चाहत्यांकडे का मागतोय पैसे?

आतापर्यंत तुम्ही सेलेब्रिटींना (Celebrities) आपल्या चाहत्यांना मदत केल्याच्या किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण करताना पाहिलं असेल. मात्र, एका सेलेब्रिटीनं चक्क चाहत्यांसकडेच पैसे मागितले. त्यानंतर चाहत्यांनाही त्याच्यावर पैशाचा वर्षाव केला.

आतापर्यंत तुम्ही सेलेब्रिटींना (Celebrities) आपल्या चाहत्यांना मदत केल्याच्या किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण करताना पाहिलं असेल. मात्र, एका सेलेब्रिटीनं चक्क चाहत्यांसकडेच पैसे मागितले. त्यानंतर चाहत्यांनाही त्याच्यावर पैशाचा वर्षाव केला.

आतापर्यंत तुम्ही सेलेब्रिटींना (Celebrities) आपल्या चाहत्यांना मदत केल्याच्या किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण करताना पाहिलं असेल. मात्र, एका सेलेब्रिटीनं चक्क चाहत्यांसकडेच पैसे मागितले. त्यानंतर चाहत्यांनाही त्याच्यावर पैशाचा वर्षाव केला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 22 नोव्हेंबर : आतापर्यंत आपण सेलेब्रिटींना (Celebrities) आपल्या चाहत्यांच्या इच्छा पूर्ण करताना पाहिलं आहे. एखादा अभिनेता आपल्या आजारी चाहत्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेला तुम्ही पाहिला असेल किंवा एखाद्या खेळाडूनं चॅरिटीसाठी आपली जर्सी दान केलेलंही तुम्ही ऐकलं असेल; मात्र चाहत्यांनी आपल्या आवडत्या सेलेब्रिटीला पैसै दिल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? नायजेरियन-अमेरिकन (Nigerian-American) वंशाचा संगीतकार डेव्हिडो (Musician Davido) याच्या बाबतीत ही गोष्ट खरी ठरली आहे. सुरुवातीला गंमत म्हणून त्यानं सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून चाहत्यांकडे पैशांची मागणी केली होती. त्याच्या चाहत्यांनी काही वेळातच त्याच्यावर पैशांचा वर्षाव केला. चाहत्यांनी दिलेली रक्कम डेव्हिडो सामाजिक कार्यासाठी (Social Work) वापरणार आहे.

डेव्हिडोनं गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ट्विट केलं होतं. 'जर मी तुम्हाला एक हिट गाणं दिलं आहे असं वाटत असल्यास मला पैसे पाठवा,' असं आवाहन त्यानं चाहत्यांना केलं होतं. त्यानंतर त्याच्यावर पैशांचा वर्षाव सुरू झाला. त्यानं गेल्या बुधवारी (17 नोव्हेंबर) फंडरेझर सुरू केला. एका बंदरात अडकलेली आपली रोल्स रॉइस बाहेर काढण्यासाठी 100 दशलक्ष नायरा (2 लाख 43 हजार डॉलर्स) उभे करणं हे त्याचं उद्दिष्ट्य होतं. त्यानं चाहत्यांना आवाहन केल्यानंतर पहिल्या दहा मिनिटांतच 17 हजार डॉलर्स जमा झाले होते. नंतर ही रक्कम वाढतच गेली. शनिवारपर्यंत त्याच्याकडे एकूण 4 लाख 85 हजार डॉलर्स (3.60 कोटी) जमा झाले होते.

Global Asian Celebrity 2020 : प्रियांका चोप्रा आणि प्रभासला मागे टाकत, हा झाला टॉप ग्लोबल एशियन सेलिब्रिटी

संगीतकार डेव्हिड एडेलके 21 नोव्हेंबर रोजी 29 वर्षांचा झाला. त्यानिमित्त गंमत म्हणून त्यानं मित्र आणि सहकाऱ्यांना वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे पाठवण्याची विनंती केली होती. त्याला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आता अशाच पद्धतीनं दर वर्षी पैसे जमा करून गरजूंना मदत करणार असल्याचं डेव्हिडो म्हणाला आहे.

डेव्हिडोनं नायजेरियातल्या अनाथाश्रमांना एकूण 6 लाख डॉलर्स (4.5 कोटी रुपये) दान करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 1 लाख 20 हजार डॉलर्स (89 लाख रुपये) तो आपल्या खिशातून दान करणार आहे, तर बाकीची रक्कम चाहत्यांकडून मिळालेली आहे. चाहत्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून गेल्या बुधवारी आणि गुरुवारी डेव्हिडोनं फंड रेझिंगसाठी (Fund raising) पोस्ट अपडेट केल्यानंतर त्याच्या अनेक सेलेब्रिटी मित्रांनीही त्याला मदत केली. नायजेरियन रॅपर एमआय अबागानं डेव्हिडोला 1 मिलियन नायरा पाठवले होते. शिवाय त्यानं डेव्हिडोसोबत एक हिट गाणं करण्याचीही इच्छा व्यक्त केली होती.

'या' मराठी कलाकारांच पहिलं नाही तर दुसरं प्रेम ठरलं यशस्वी; पाहा कोण आहेत हे प्रसिद्ध कपल्स

डेव्हिडो हा आफ्रिकेतला गेल्या दशकभरातल्या सर्वांत लोकप्रिय आणि प्रमुख कलाकारांपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर तो सर्वाधिक फॉलो केला गेलेला आफ्रिकन कलाकार आहे. त्याच्या 'दामी डुरो' आणि 'फॉल' या गाण्यांसाठी तो ओळखला जातो. डेव्हिडोनं सामाजिक कार्यासाठी घेतलेला पुढाकार त्याच्या चाहत्यांना आवडला असून त्यांनी त्याचं कौतुकही केलं आहे.

First published:

Tags: Rock music, Tv celebrities