Home /News /entertainment /

Global Asian Celebrity 2020 : प्रियांका चोप्रा आणि प्रभासला मागे टाकत, हा झाला टॉप ग्लोबल एशियन सेलिब्रिटी

Global Asian Celebrity 2020 : प्रियांका चोप्रा आणि प्रभासला मागे टाकत, हा झाला टॉप ग्लोबल एशियन सेलिब्रिटी

दर वर्षी आशियातल्या सेलेब्रिटींची यादी जाहीर होते. त्यात भारतीय नावं असतात, पण प्रामुख्याने मुख्य प्रवाहातल्या हिरो-हिरोइन्सची Global Asian Celebrity 2020 च्या लिस्ट मध्ये पहिला क्रमांक पटकावला असून तो केवळ भारतातच (India) नाही तर सम्पूर्ण आशियात (Asia) चर्चेचा विषय झाला आहे

पुढे वाचा ...
    मुंबई, 10 डिसेंबर : प्रत्येक वर्षाच्या अखेरीस Global Asian Celebrity ची यादी जाहीर करण्यात येते. यात संपूर्ण आशियातील (Asia)  टॉप 50 अभिनेत्यांची (Actor) नावं असतात. दरवर्षी या लिस्ट मध्ये बऱ्याच भारतीय अभिनेत्यांचा (Indian Actors) समावेश असतो. ब्रिटनच्या (Britain)  इस्‍टर्न आय न्‍यूजपेपरने (EasternEye) वर्ष 2020 च्या  टॉप ग्‍लोबल एशियन सेल‍िब्रिटीजची (Global Asian Celebrities)  यादी प्रदर्शित केली आहे. या यादीत नेहमीच्या यशस्वी मुख्य प्रवाहातल्या हिरो हिरोइनऐवजी पडद्यावरचा व्हिलन पण खऱ्या आयुष्यात हिरोसारखं काम करणारा सोनी सूद (Sonu Sood) पहिल्या क्रमांकावर आहे. सोनूने कोरोना काळात प्रवासी मजूर, मुंबई पोलीस (Mumbai Police) तसंच इतर अनेक गरजवंतांना  मदत केली होती. अद्यापही सोनूकडून  मदतीचा ओघ सुरूच आहे. 20 वर्षांपूर्वी बॉलीवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या सोनूने आज संपूर्ण जगातभरात नावलौकिक मिळवलं आहे. या यशाबद्दल सोनूने आनंद व्यक्त केला आहे. सोनूने त्याच्या सगळ्या फॅन्सचे (Fans) आभार मानले आहेत. कोरोना (Coronavirus pandemic) काळात गरजूंना मदत करणं आपलं कर्तव्यच होतं आणि या पुढेही भारतीय नागरिक (Citizen of India) म्हणून शक्य ती मदत करणार असल्याचं सोनी सांगतो. अजूनही काहीजण सोनूकडे मदतीसाठी संपर्क करत आहेत. गरजूंना सोनूला संपर्क करायचा असेल तर ते सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर तसंच सोनूने दिलेल्या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधू शकतात. सोनू पाठोपाठच गायक अरमान मलिक (Armaan Malik) ने 5वा तर देशी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ने  6वा क्रमांक पटकावला आहे. अरमानचा नुकताच 'हाउ मेनी' (How Many) हा ट्रॅक प्रदर्शित झाला असून प्रियांका लकरच व्हाईट टायगर (White Tiger) या सिनेमात दिसून येणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Actor, Bollywood, Sonu Sood

    पुढील बातम्या