मुंबई 30 एप्रिल: महाराष्ट्र सरकारनं सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. (Thackeray Government) 28 एप्रिल रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये 18 ते 44 या वयोगटातील लोकांसाठी मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान सरकारच्या या निर्णयाचं अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी स्वागत केलं आहे. शिवाय आम्ही लस घेतली तुम्ही देखील लवकर घ्या असा सल्ला ते आपल्या चाहत्यांना देत आहेत. मात्र सल्ला देणाऱ्या या सेलिब्रिटींवर प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) संतापली आहे. “तुम्ही खरंच लस घेतली आहे तर मग सेंटरचं नाव देखील सांगा” असा टोला तिनं लगावला.
नेमकं काय म्हणाली निया शर्मा?
निया सोशल मीडियावर प्रंचड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती कोनोरासंदर्भात केलेल्या ट्विटमुळं चर्चेत आहे. “ज्या सेलिब्रिटींनी कोरोनाची लस घेतली आहे त्यांनी त्या सेंटरचं नाव देखील सांगावं. त्यामुळं लोकांना जास्त वेळ रांगेत थांबावं लागणार नाही. आणि जर तुम्हाला त्या सेंटरचं नावच सांगायचं नसेल तर उगाचच सल्ले देऊ नका.” अशा आशयाची पोस्ट तिनं केली आहे. तिच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
Video: पाहावं ते अजबच! बॉलिवूड निर्माती पायाने नाही तर डोक्याने चढली कारमध्ये
Every woke celebrity of this nation urging people to get vaccinated...Kindly mention the name of the centres that have it readily available at this moment so that people queuing up in thousands for days now don’t look stupid. P.S we need to get vaccinated.
— NIA SHARMA (@Theniasharma) April 29, 2021
‘फुकटचे सल्ले थांबव अन् स्वत: मदत कर’; देवोलीनानं कंगना रणौतला सुनावले खडेबोल
18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं, "आज राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra Cabinet) निर्णय घेतला आहे की, राज्यातील 5 कोटी 71 लाख (18 ते 44 वयोगटातील) नागरिकांना मोफत लसीकरण करायचं. त्यामुळे अंदाजे दोन कोटी लशींचे डोस राज्य सरकारला विकत घ्यावे लागणार आहेत त्यासाठी साधारणत: 6 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार आहे."
लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी
लसीकरणात महाराष्ट्र राज्य हे देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 53 लाख 37 हजार 382 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र पुढे आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रेसर आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकर राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांचे लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.