मुंबई 30 एप्रिल: बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) ही आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती अनेकदा रोखठोक प्रतिक्रिया देते. कदाचित त्यांमुळंच ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. दरम्यान यावेळी देवोलीनानं बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतवर (Kangana Ranaut) निशाणा साधला आहे. दुसऱ्यांवर टीका करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वत: मदत कर असा उपरोधिक टोला तिनं कंगनाला लगावला आहे.
देवोलीनानं नुकतीच नवभारत टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं सद्य परिस्थितीवर भाष्य करताना कंगना रणौतला खडेबोल सुनावले. गेल्या काही काळात कंगना सातत्यानं महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहे. शिवाय बॉलिवूड सेलिब्रिटींनी केलेल्या मदतीवर देखील प्रश्न उपस्थित करत आहे. या पार्श्वभूमीवर देवोलीनानं तिला उपरोधिक टोला लगावला. ती म्हणाली, “कंगनानं वायफळ बडबड थांबवावी अन् स्वत: घराबाहेर पडून लोकांना मदत करावी. ऑक्सिजन कुठे मिळतंय, लस मिळवण्यासाठी कुठे आणि कसं रजिस्ट्रेशन करावं, कुठल्या रुग्णालयात उपचारासाठी बेड उपलब्ध आहेत. यांसारखी कित्येक काम ती पैसे खर्च केल्याशिवाय देखील करु शकते. इतर सेलिब्रिटी आपापल्या परीनं मदत करत आहेत. ही नुसती लोकांना फुकटचे सल्ले देतेय अन् टीका करतेय.” लक्षवेधी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी राखी सावंतनं देखील तिला असाच काहीसा सल्ला दिला होता. 'सरकारला फुकटचे सल्ले देत फिरण्यापेक्षा कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन दे' असा टोला तिनं लगावला होता.
धनंजय माने नाव कसं सुचलं कसं?; पाहा ‘अशी ही बनवाबनवी’मधील भन्नाट किस्सा
भारतात रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 3293 रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे, दैनंदिन रुग्णसंख्याही पुन्हा एकदा वाढली असून गेल्या 24 तासांत 3 लाख 60 हजार 960 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Kangana ranaut, Marathi entertainment, Vaccinated for covid 19