मुंबई 30 एप्रिल : लाइव्ह स्टंट (live stunt), फ्लिप्स, मार्शल आर्ट्स (marshal arts) हे काही चित्रपटांसाठी किंवा अभिनेते, अभिनेत्रींसाठी नवं नाही. अनेक चित्रपटांत तसेच रियॅलिटी शो, डान्स यामध्ये नेहमीच विविध स्टंट पहायला मिळतात. पण यावेळी एका प्रसिद्ध चित्रपट निर्मातीने चक्क मीडियासमोर लाइव्ह तसेच हटके स्टंट केला. व्हिडीओ पाहून तुम्हालाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. प्रसिद्ध चित्रपट निर्माती क्रिषिका लुल्ला (Krishika Lulla) हिने हा स्टंट केला आहे. क्रिषिका हि एक निर्माती असली तरही तिचा फिटनेस कोणा अभिनेत्री पेक्षा कमी नाही. ती आपल्या फिटनेस वर फार लक्ष केंद्रित करते. यावेळी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या जीम वरुन परतत असताना काही मीडियाने तिचा हा आगळावेगळा व्हिडीओ शुट केला.
‘फुकटचे सल्ले थांबव अन् स्वत: मदत कर’; देवोलीनानं कंगना रणौतला सुनावले खडेबोलव्हिडीओत ती तिच्या कार जवळ फूल फ्लिप करत पाय वर डोक खाली अशी पोझ करत पाय गाडीवर टाकते व त्यानंतर दोन्ही पाय गाडीच्या खिडकितून आत टाकत स्वत:च संपूर्ण शरिर गाडीत ओढते. हा सगळा प्रकार अगदी सफाइने आणि झटपट तिने केला त्यामुळे पाहणारेही गोंधळून गेले होते. अर्थात तिचा फिटनेस या ठिकाणी कामी आला होता. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची चांगली चर्चा होतेय. तिच्या या हटके स्टंट वर तिला अनेक कमेंट्स ही मिळाल्या आहेत.
क्रिषिका ही एक चित्रपट निर्माती असून अनेक प्रसिद्ध चित्रपटांची तिने निर्मिती केली आहे. रांझना, तनू वेड्स मनू रिटर्न, देसी बॉइज यासारख्या अनेक चित्रपटांची ती प्रोड्युसर आहे.
याशिवाय क्रिषिका ही सुनिल लुल्ला यांची पत्नी आहे, सुनील हे इरोस इंटरनॅशनल (Erose international) चे एमडी आणि वाइस चेअरमन आहेत. सोशल मीडिया क्रिषिका सतत तिचे फिटनेस व्हिडीओज पोस्ट करत असते.