आणखी एका स्टारकिड्सचं मनोरंजन विश्वात पाऊल; पोलिसांच्या भूमिकेत दिसणार

आणखी एका स्टारकिड्सचं मनोरंजन विश्वात पाऊल; पोलिसांच्या भूमिकेत दिसणार

पोलिसांची शौर्यगाथा सांगणारी मालिका लवकरच येत आहे, त्यात एक नवा चेहरा झळकणार आहे.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी: मनोरंजन विश्वात अनेक स्टारकिड्स आई वडिलांच्या पाऊलांवर पाऊल टाकत स्वतःचं नाव घडवत आहेत. आता यामध्ये आणखी एका नावाचा समावेश होत आहे. आणखी एक स्टारकिड्स मनोरंजन विश्वात पाऊल ठेवत आहे. हा स्टारकिड म्हणजे सोहम बांदेकर (Soham bandekar). सोहम हा आदेश बांदेकर (Aadesh bandekar) आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra bandekar) यांचा मुलगा. सोहम लवकरच स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘नवे लक्ष्य’ या मलिकेतून सोहम मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे. आदेश बांदेकर स्वतः या मालिकेची निर्मिती करत आहेत. या मालिकेत सोहम पोलिसांची भूमिका साकारणार असून ही त्याची पहिलीच मालिका आहे.

या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. 7 मार्चपासून ही मालिका पडद्यावर झळकणार आहे. दर रविवारी रात्री 10 वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत महाराष्ट्र पोलीस कसे कार्यरत असतात आणि सगळ्या गुन्हेगारांना कशा पद्धतीने अटक करतात हे सगळ्यांच्या समोर येणार आहे. महाराष्ट्र पोलीस 24 तास जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी कसे झटतात हा संपूर्ण प्रवास आपल्याला या मालिकेतून अनुभवायला मिळेल.

हे वाचा -   ‘फास्टर फेणे’ च्या दिग्दर्शकाचा नवा प्रयोग; आता थिएटर होणार ‘झोंबीमय’, पाहा TEASER

‘आपले कर्तव्यनिष्ठ पोलीस आणि त्यांच्या डिपार्टमेंटची शौर्यगाथा  सांगताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. काय कस लागतो, काय हुशारी लागते आणि कसे तुम्हाला सतर्क रहाण्यास मदत होईल हे या मालिकेतून लवकरच तुम्हाला उलगडेल. ही मालिका पाहताना आपल्या पाठीशी भावा-बहिणीप्रमाणे खंबीरपणे आपले महाराष्ट्र पोलीस उभे आहेत याची तुम्हाला जाणीव होईल.’  असे स्टार प्रवाहचे प्रोग्रामिंग हेड सतीश राजवाडे यांनी म्हटलं आहे.

Published by: Aditya Thube
First published: February 23, 2021, 8:47 PM IST

ताज्या बातम्या