Home /News /entertainment /

ठरलं! पायल रोहतगी-संग्राम सिंह लवकरच बांधणार लग्नगाठ, यादिवशी करणार डेस्टिनेशन वेडिंग

ठरलं! पायल रोहतगी-संग्राम सिंह लवकरच बांधणार लग्नगाठ, यादिवशी करणार डेस्टिनेशन वेडिंग

मनोरंजनसृष्टीत लगीनसराई (Wedding Season) अजूनही सुरुच असल्याचं दिसून येतं. कारण आणखी काही कलाकार लग्नबंधनात अडकण्याची तयारी करत आहेत. आज आपण बोलत आहोत पायल रोहतगी आणि रेसलर संग्राम सिंह यांच्या लग्नाबाबत.

    मुंबई, 28 मे- मनोरंजनसृष्टीत लगीनसराई   (Wedding Season)  अजूनही सुरुच असल्याचं दिसून येतं. कारण आणखी काही कलाकार लग्नबंधनात अडकण्याची तयारी करत आहेत. आज आपण बोलत आहोत पायल रोहतगी आणि रेसलर संग्राम सिंह यांच्या लग्नाबाबत.  संग्राम सिंहने   (Sangram Singh)  सोशल मीडियावर गर्लफ्रेंड पायल रोहतगीसोबत   (Payal Rohtagi)  लग्नाची घोषणा केल्यापासून हे सेलिब्रिटी जोडपं कधी लग्न बंधनात अडकणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पायल रोहतगी 'लॉकअप'मध्ये असतानाच संग्राम सिंहने तिच्याशी लग्न करण्याची आपली योजना उघड केली होती. ते दोघे जुलैमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. तथापि दोघांच्या लग्नाची तारीख मात्र निश्चित झाली नव्हती. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण या दोघांनी आपल्या लग्नाची तारीख उघड केली आहे. नुकतंच ETimes ला दिलेल्या मुलाखतीत संग्राम सिंहने सांगितले की, 'तो गर्लफ्रेंड पायल रोहतगीसोबत डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. त्याने सांगितले की तो 9 जुलै 2022 रोजी लग्नगाठ बांधणार आहे. ज्याबद्दल तो उत्साही आणि नर्व्हस देखील आहे. कारण, आता तो पायलसोबत एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.या दोघांनी अनेक वर्ष या दिवसाची वाट पाहिली आहे. अखेर त्यांनी लग्नाची तारीख निश्चित करत, चाहत्यांना आनंदाची मेजवानी दिली आहे. संग्राम आणि पायलने सोशल मीडियावर आपल्या लग्नाच्या प्लॅनबद्दल सांगितल्यापासूनच सर्वांचं लक्ष या दोघांकडे लागलं होतं. अशातच पायल लॉकअपमध्ये सहभागी झाली होती. लॉकअप संपल्यानंतर आता या दोघांनी लग्नाची तारीख जाहीर केली आहे. दिलेल्या मुलाखतीत बोलताना संग्राम म्हणलं, 'मी पायलसोबत लग्न करण्यासाठी खूप उत्सुक आणि नर्व्हस आहे. आम्ही खूप दिवसांपासून एकत्र आहोत आणि आता आम्ही लग्न करणार आहोत. विवाह हा आयुष्याचा एक मोठा टप्पा आहे. आम्ही अपेक्षा करतो की आम्ही एकत्र आनंदी आहोत. कारण आम्ही एकत्र नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहोत''.हे दोघे गेली 12 वर्षे एकेमकांना डेट करत आहेत. (हे वाचा:राखी सावंतला बॉयफ्रेंडने भेट दिली BMW आणि दुबईत घर, पण व्यक्त केली अनोखी इच्छा ) आपल्या लग्नाबाबत बोलताना संग्राम सिंह पुढे म्हणाला,- 'पायल आणि मी 9 जुलैला लग्न करणार आहोत. माझ्या आई आणि बहिणीने लग्नाची तारीख निवडण्यात आम्हाला मदत केली. आम्ही सध्या ठिकाण ठरवण्याचे काम करत आहोत. आम्ही अत्यंत जवळच्या लोकांसोबत डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा प्लॅन करत आहोत. आम्ही अहमदाबाद किंवा उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार असं काहीसं सुरु आहे.संग्रामच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की दोघेही खाजगी पद्धतीने लग्न करणार आहेत. ज्यामध्ये फक्त त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी होणार आहेत. यानंतर पायल आणि संग्राम मुंबईत मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील त्यांच्या मित्रांसाठी एक भव्य रिसेप्शन देखील आयोजित करणार आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Tv actors, Wedding

    पुढील बातम्या