मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: चित्रपटाच्या सेटवरची गर्दी पाहून घाबरला वरुण; गाडीवर चढून चाहत्यांसमोर जोडले हात

VIDEO: चित्रपटाच्या सेटवरची गर्दी पाहून घाबरला वरुण; गाडीवर चढून चाहत्यांसमोर जोडले हात

Bhediya Fim Shooting:'भेडिया' या चित्रपटाचं शूटिंग सध्या अरुणाचल प्रदेशात सुरू आहे. येथील चित्रपटाच्या सेटवर आज चाहत्यांनी जोरदार गर्दी (Fan Mob) झाली होती, की वरुणला (Varun dhawan) त्यांच्या गाडीवर चढून चाहत्यांना विनंती करावी लागली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 08 मार्च: बॉलीवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) त्यांच्या आगामी 'भेडिया' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. सध्या या चित्रपटाचं शूटिंग अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सुरू आहे. गेल्या आठवड्यातचं बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन आणि वरूण धवने एका खाजगी विमानाने अरुणाचल प्रदेशला गेले आहेत. आता या चित्रपटाचं शुटींग सुरळीत झालं आहे. मात्र वरुण धवनच्या आणि क्रिती सेननचे चाहते सतत याठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत.

आज चित्रपटाच्या सेटवर इतकी गर्दी झाली होती, की वरुणला त्यांच्या गाडीवर चढून चाहत्यांना विनंती करावी लागली. वरुणने गाडीवर चढून हात जोडून चाहत्यांना विनंती केली आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याच्या नम्रपणाचं कौतुक केलं आहे.

या व्हायरल व्हिडिओत वरुण धवन जमलेल्या गर्दीला शांत करताना दिसत आहे. या व्हिडिओत वरुण ज्या पद्धतीनं लोकांना शांत करत आहे, ते अतिशय मजेदार आहे. जमलेल्या लोकांनी त्याचं म्हणणं ऐकावं त्यासाठी तो प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी वरुण गाडीच्या छतावर उभा राहून चाहत्यांना म्हणत आहे की, 'चित्रपटाचं शूटिंग अद्याप बाकी आहे, त्यामुळे मी आणखी काही दिवस इथेच आहे. म्हणून आता घाई करू नका आणि शूटींग पूर्ण होऊ द्या.' पण चाहते ऐकायला तयार नाहीत. ते मोबाइल टॉर्च ऑन करून जोरात ओरडताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'भेडिया' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे . हा चित्रपट पुढील वर्षी 14 एप्रिलला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या रिलीज तारखेबरोबरच 'भेडिया'चा टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता. हा टीझर खूपच रोमाचंक असून अनेक चाहत्यांनी याला पसंती दर्शवली होती. आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हे ही वाचा -लांडगा आला रे आला! वरुण धवनचा हा VIDEO तुम्ही पाहिलात का?

'भेडिया' हा हॉरर चित्रपट युनिवर्सच्या बॅनरखाली निर्मित केला जात आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजानच्या मेडॉक फिल्म्सकडून केली जात आहे. वरुण धवन आणि क्रिती सेननचा 'भेडिया' हा चित्रपट विनोदी आणि भितीदायक गोष्टींनी परिपूर्ण भरलेला आहे. याची एक झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन 'स्त्री' आणि 'बाला' या अप्रतिम कलाकृती बनवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अमर कौशिक करत आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Varun Dhawan, Viral video.