जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मन उडू उडू झालं' मालिकेत लवकरचं घुमणार 'अंगाई' चे स्वर; मेकिंग व्हिडिओनं जिंकली मनं

'मन उडू उडू झालं' मालिकेत लवकरचं घुमणार 'अंगाई' चे स्वर; मेकिंग व्हिडिओनं जिंकली मनं

'मन उडू उडू झालं' मालिकेत लवकरचं घुमणार 'अंगाई' चे स्वर; मेकिंग व्हिडिओनं जिंकली मनं

'मन उडू उडू झालं' मालिकेत लवकरचं घुमणार 'अंगाई' चे स्वर; मेकिंग व्हिडिओनं जिंकली मनं

‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Jhala) मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. दीपू (Deepu) लवकरच कोमातून बाहेर येणार आहे. मालिकेला आलेल्या नव्या वळणावर लवकरच मालिकेत अंगाईचे (Angai) स्वर ऐकायला मिळणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मे:  झी मराठीवरील (Zee Marathi) सर्वांची लाडकी मालिका म्हणजे ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Jhal)  मालिकेत सर्वांच्या लाडक्या दीपूचा (Deepu) अपघात झाल्यानं मालिका सध्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. दीपूच्या अपघातानं सगळ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इंद्रा दीपूच्या आठवणीत फारच भावूक झाला आहे. मात्र मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. दीपू लवकरच कोमातून बाहेर येणार आहे. मालिकेला आलेल्या नव्या वळणावर लवकरच मालिकेत अंगाईचे (Angai) स्वर ऐकायला मिळणार आहेत. मालिकेत एक  सुंदर अंगाई गीत प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. प्रसिद्ध गायिका कीर्ती किल्लेदार (Kirti Killedar) हिने ‘मन उडू उडू झालं’ मालिकेसाठी सुंदर गाणं रेकॉर्ड केलं आहे. ‘नीज नीज आता नीज रे मना…’ असे गाण्याचे बोल आहेत. या गाण्याच्या निमित्ताने मराठी मालिकेत पहिल्यांदा एक अंगाई गीत पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे. ‘नीज नीज आता नीज रे मना…’ या गाण्याचा मेकिंग प्रदर्शित झाला आहे. या व्हिडीओमध्ये गाण्यातील कलाकारांनी अंगाई गीताविषयी अधिक माहिती सांगितली आहे. गाण्याविषयी बोलताना गायिका कीर्ती किल्लेदार म्हणाली,  ‘फार सुंदर गाणं रेकॉर्ड केलं आहे.  गाणं प्रेक्षकांपर्यंत कधी पोहोचतेय याची आम्ही वाट पाहतोय. गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे’.

जाहिरात

‘नीज नीज आता… नीज रे मना… सुखमयी स्वप्न ते पाहना पुन्हा!’, असे या अंगाई गीताचे शब्द आहेत.  मालिकेत दीपू लवकरच बरी होणार आहे. त्यामुळे हे गाणं इंद्रा आणि दीपू यांच्यावरच शूट करण्यात येणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्याचप्रमाणे दीपू आणि तिच्या आईवर हे गाणं शुट करा अशा कमेंट देखील येत आहे. हेही वाचा - लग्नानंतर कामावर रूजू होताच हृताने शेअर केले ‘ते’ दोन फोटो, काय आहे यात खास? ‘नीज नीज आता’ हे गाणं समीहन (Samihan) याने संगीतबद्ध केलं असून गायिका कीर्ती किल्लेदार हिने गायलं आहे. तसेच अभिषेक खणकर (Abhishek Khankar) याने गाण्याचे शब्द लिहिले आहेत.  गाण्यातील वादक किरण विणकर यांच्या बासरीचे मधुर स्वर मनाला स्पर्शून जातात. ‘नीज नीज रे मना’ हे गाणं लवकरचं मालिकेत पाहायला मिळणार आहे. हे गाणं ऐकायल्या नंतर चाहत्यांना हृताच्या आधीच्या मालिकेतील गाण्यांची आठवण झाली. मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी (Mandar Devsthali) यांच्या ‘फुलपाखरु’ (Phulpakharu) मालिकेतही अनेक सुंदर गाणी होती. याचीच आठवण अनेक चाहत्यांना झाली आहे. गाण्याच्या मेकिंग व्हिडीओवर कमेंट करत एका युझरने म्हटलंय, ‘मंदार देवस्थळी सरांच्या फुलपाखरू मालिकेत जे गाणे आहेत त्या गाण्याला आज पर्यंत कोणतीच सिरीयल तोड देउ शकली नाही’. तर अनेकांनी गायिका कीर्ती किल्लेदारच्या आवाजाचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात