जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नानंतर कामावर रूजू होताच हृताने शेअर केले 'ते' दोन फोटो, काय आहे यात खास?

लग्नानंतर कामावर रूजू होताच हृताने शेअर केले 'ते' दोन फोटो, काय आहे यात खास?

लग्नानंतर कामावर रूजू होताच हृताने शेअर केले 'ते' दोन फोटो, काय आहे यात खास?

लग्नानंतर हृता दुर्गुळे नं कामाला सुरूवात केली आहे. कामाला सुरूवात करताच तिनं दोन खास फोटो (Hruta Durgule Latest Photos) शेअर करत एक पोस्ट देखील केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 मे- अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) मागच्या काही दिवसांपासून लग्न, हनिमून यामुळं चर्चेत आहे. या सगळ्यामुळं मागच्या काही दिवसांपासून तिनं मन उडू उडू झालं मालिकेतून देखील ब्रेक घेतला होता. मालिकेत प्रेक्षक तिला मिस करत होते. आता सगळं आवरल्यानंतर हृता दुर्गुळे पुन्हा कामावर रूजू झाली आहे. लग्नानंतर तिनं कामाला सुरूवात केली आहे. कामाला सुरूवात करताच तिनं दोन खास फोटो  (Hruta Durgule Latest Photos) शेअर करत एक पोस्ट देखील केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. हृता दुर्गुळेने इन्स्टाला दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ती जांभळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. या फोटोत तिचं लग्न झालेलं नाही असचं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटो तिचा आणि प्रतीकचा आहे, तोही लग्नातील… हे दोन खास फोटो शेअर करत हृताने लिहिले आहे की, ‘‘कामावर परत रुजू झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सर्व मेसेज करत आहात आणि प्रेमाचा वर्षाव करत आहात, त्यासाठी मी नेहमी तुमची कृतज्ञ राहीन. माझ्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे. लवकरच याबद्दल सांगणार आहे. ’’ वाचा- VIDEO : पोलिसास देखील आवरला नाही सुरेखा कुडचींसोबत फोटो काढण्याचा मोह हृता पुढे म्हणते की, ‘‘माझ्या कामाची सुरुवात चित्रपटाच्या टीझरने करत आहे. खूप वेळ वाट पाहिली आहे! पण म्हणताता ना चांगल्या गोष्टींना वेळ हा लागतोच आणि ती प्रतीक्षा तुम्हाला आणखीन चांगली शिकवण देते. अनन्यासाठी जे काही आहे त्या सर्वांचे स्वागत करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आणि या सगळ्या प्रवासात जेव्हा माझी सर्वात आवडती व्यक्ती माझ्यासोबत असते… प्रतीक शाह. मला अजून काय हवे आहे! त्यासाठी मी खूप आभारी आहे.’’

जाहिरात

हृताची मोठ्या पडद्यावर दणक्यात एंट्री झाली आहे.  एकाच दिवशी  तिच्या  2 सिनेमांचे टिझर प्रदर्शित झाले आहेत. अनन्या आणि टाईमपास 3 या सिनेंमाचे टिझर आज प्रदर्शित झाले. छोटा पडद्या गाजवणारी अभिनेत्री आता मोठा पडदा गाजवण्यास सज्ज झाली आहे. चाहते देखील तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात