सध्या ती तिचा एक्स बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत झालेल्या ब्रेकअपमुळं चर्चेत आहे. खरं तर त्यांच्या ब्रेकअपला आता एक वर्ष उलटून गेलं आहे. पण पहिल्यांदाच तिनं या प्रकरणावर भाष्य केलं.
अनुषा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अलिकडेच तिनं आपल्या चाहत्यांसोबत गप्पा मारण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह सेशन केलं होतं.
त्यावेळी तिनं एका चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना करणवर जोरदार टीका केली. शिवाय आपल्या ब्रेकअपचं कारण सांगितलं.
“करणनं मला फसवलं. तो एकाच वेळी दोन तरुणींना डेट करत होता. तो अनेक वर्ष माझ्या भावनांशी खेळत होता. त्यामुळं त्याचा खरा चेहरा समोर येताच मी ब्रेकअप केलं.” असं ती म्हणाली.
ब्रेकअपनंतर बराच काळ ती नैराश्येत देखील होती. आत्महत्या करण्याचाही विचार तिच्या मनात येत होता. असा दावाही मनुषीनं यावेळी केला.
सध्या ती ऑस्ट्रेलियन गायक जेशन शाह याला डेट करत आहे. त्याच्यासोबतचे फोटो देखील ती सोशल मीडियावर शेअर करते.