• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Dostana 2 मधून कार्तिक आर्यनला हटवताच करण जोहर अडचणीत; निर्णय पडणार महागात

Dostana 2 मधून कार्तिक आर्यनला हटवताच करण जोहर अडचणीत; निर्णय पडणार महागात

दोस्ताना 2 (dostana 2) या चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aryan) बाहेर करताच करण जोहरच्या (Karan johar) या फिल्मवर बहिष्कार टाकण्याची तयारी सुरू झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 16 एप्रिल : ‘दोस्ताना 2’ (Dostana 2) हा फिल्ममधून अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aryan) बाहेर करण जोहरवर (Karan Johar) पुन्हा एकदा प्रेक्षक संतापलेले आहेत. सोशल मीडियावर करण जोहरला नेटिझन्सनी लक्ष्य केलं आहे. त्याच्यावर निशाणा साधला आहे. दोस्ताना 2 या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) मुख्य भूमिका साकारत होते. चित्रपटाचं काही शूटींग मुंबई आणि चंदीगडमध्ये पूर्णदेखील झालं होतं, तर काही चित्रीकरण होणं बाकी आहे. पण आता कार्तिकला मात्र चित्रपटातून हटवण्यात आलं आहे. एका वृत्तानुसार कार्तिकची टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी चित्रपटासाठी तारखा देत नव्हती. त्यामुळे शूटिंग रखडलं होतं आणि याच कारणाने कार्तिकला चित्रपटातून बाहेर पडावं लागलं होतं. पण यामुळे त्याचे चाहते फारच नाराज झाले आहेत. हे वाचा - कार्तिक आयर्न आणि करण जोहरचा 'दोस्ताना' तुटला; चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता कार्तिकची चित्रपटातून बाहेर पडल्याची बातमी समजताच कार्तिकच्या चाहत्यांनी ट्विटर वर #KartikAryan या त्याच्या नावाचा ट्रेंड करायला सुरुवात केली. शिवाय निर्माता करण जोहरला त्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. करणला फक्त स्टारकिड्सचं (starkids) हवे असतात, अशी कमेंट बहुतेक युझर्सनी केली आहे. तर अनेकांनी त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. हे वाचा - सिम्पल कपडे, साधी सजावट; अभिनेत्री दिया मिर्झाने का केलं नाही थाटामाटात लग्न? अद्याप कार्तिक किंवा धर्मा प्रोडक्शनने यावर काहीही भाष्य केलं नसलं तरीही हा ट्रेंड ट्विटरवर चांगलाच गाजत आहे. कार्तिकनंतर अभिनेता राजकुमार रावची (Rajkumar Rao) चित्रपटात वर्णी लागण्याची शक्यता आहे. कार्तिक चित्रपटात येण्यापूर्वी राजकुमारलाच याविषयी विचारणा झाली होती. पण काही कारणास्तव त्याने नकार दिला होता. अभिनेता विकी कौशलचं (Vicky Kaushal) देखील नाव समोर येत आहे. त्यामुळे आता कार्तिकच्या जागी नक्की कोणत्या अभिनेत्याची वर्णी लागते हे पाहणं औत्युक्याचं ठरेल.
  Published by:News Digital
  First published: