मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Netflix ची नाराजी पडतेय महागात, या प्रसिद्ध सीरिजचा दुसरा सीझन वारंवार करावा लागतोय शूट

Netflix ची नाराजी पडतेय महागात, या प्रसिद्ध सीरिजचा दुसरा सीझन वारंवार करावा लागतोय शूट

या सीरिजच्या यशानंतर निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनची घोषणा केली होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली क्राइमचा (Delhi Crime 2 Update) दुसरा सीझन अनेक कारणांनी चर्चेत आहे.

या सीरिजच्या यशानंतर निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनची घोषणा केली होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली क्राइमचा (Delhi Crime 2 Update) दुसरा सीझन अनेक कारणांनी चर्चेत आहे.

या सीरिजच्या यशानंतर निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनची घोषणा केली होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली क्राइमचा (Delhi Crime 2 Update) दुसरा सीझन अनेक कारणांनी चर्चेत आहे.

मुंबई, 26 एप्रिल: नेटफ्लिक्सने परदेशातच नाही तर भारतताही दर्जेदार कार्यक्रम प्रेक्षकांना दिले आहेत. समीक्षकांसह प्रेक्षकांनीही काही वेब सीरिज-चित्रपट अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहेत. 'दिल्ली क्राइम' (Netflix Web Series Delhi Crime) या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांसह समीक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. ही वेबसीरिज दिल्लीतील निर्भया हत्याकांडावर (Nirbhaya Rape and Murder Case) आधारित आहे. नेटफ्लिक्सच्या या सीरिजमध्ये शेफाली शाह, रसिका दुगल आणि राजेश तैलंग यांच्यासह सर्वच कास्टने दमदार काम केले आहे. या सीरिजच्या यशानंतर निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनची घोषणा केली होती. तेव्हापासून ही सीरिज चर्चेत आहे.

मात्र गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली क्राइमचा (Delhi Crime 2 Update) दुसरा सीझन अनेक कारणांनी चर्चेत आहे. दुसऱ्या सीझनच्या शूटिंगबाबत नेटफ्लिक्स नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दिल्ली क्राइमच्या मेकर्सना अनेक सीन्स पुन्हा पुन्हा शूट करण्यास सांगितले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, 'दिल्ली क्राइम'चा दुसरा सीझन ज्याप्रकारे शूट केला जात आहे यावर नेटफ्लिक्स नाराज आहे. त्यांनी अनेक सीन पुन्हा शूट करण्याचे आदेश दिले आहेत. या सीरिजचे मोठे भाग पुन्हा शूट झाल्याने Netflix वरील या क्राइम थ्रिलर सीरिजचे प्रदर्शन लांबले आहे. आधीच कोरोना व्हायरस पँडेमिकमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दुसऱ्या सीझनच्या चित्रीकरणालाही बराच वेळ लागला होता, त्यात आता रिशूट करावे लागत असल्याने मेकर्सचा आणखी वेळ जात आहे.

हे वाचा-Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या टीमला मागावी लागली माफी, लता मंगेशकरांच्या गाण्याबाबत दिली चुकीची माहिती

दिल्ली क्राइमच्या दुसऱ्या सीझनचे रिफिल्मिंग करण्याबाबत शोच्या निर्मात्यांना Netflix द्वारे सांगितले जात असून, हे अशाप्रकारचे दुसरे असे विस्तृत रीशूट आहे. निर्माते राजेश मापुस्कर आणि श्रोता तनुज चोप्रा यांच्या कामावर नेटफ्लिक्स समाधानी नाही. दरम्यान Netflix निर्माते बदलण्याचा किंवा मालिका रद्द करण्याचा विचार करत आहे की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हे वाचा-Tiger Shroff ला पाहून 'जबरा फॅन'ला आली चक्कर, 'हिरो'ने चाहतीसाठी केलं असं काही... पाहा VIDEO

'दिल्ली क्राइम'ला मिळाला होता एमी अवॉर्ड

या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला होता, ही सीरिज सुपरहिट ठरली होती. सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजच्या श्रेणीत या वेब सीरिजला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळाला होता. या वेबसीरिजचा पहिला सीझन रिची मेहताने दिग्दर्शित केला होता. या सात एपिसोड्स असणाऱ्या सीरिजमध्ये 2012 च्या दिल्ली गँगरेप प्रकरणातील भयानक तपशील मांडण्यात आले होते.

First published:
top videos

    Tags: Delhi, Netflix