युगांडा, 18 फेब्रुवारी : हॉलीवूडची चाइल्ड आर्टिस्ट निकिता पर्ल वेलिग्वा हिचे वयाच्या अवघ्या 15 वर्षी निधन झाले. डिस्नीच्या 'क्वीन ऑफ कटवे' या सिनेमात निकिताने उल्लेखनीय काम केले होते. निकिता 2016पासून ब्रेन ट्यूमरने त्रस्त होती. तिचा आजार वर्षभरापूर्वी नीट झाला होता. मात्र, 2019 मध्ये निकिताला दुसऱ्यांदा ट्यूमरचे निदान झाले. पण यावेळी निकिताचा आजार बरा होऊ शकला नाही. 16 फेब्रुवारी रोजी निकिताचे निधन झाले.
Fare thee well Nikita Pearl Waligwa. You were a darling to many and we have lost you to brain tumor at such a tender age. Nikita was in S.3. Rest in Perfect Peace dear pic.twitter.com/ny8I9YAjsQ
— Gayaza High School (@gayazahigh) February 16, 2020
चौथीत शिकत होती निकिता
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, निकिता इयत्ता चौथीत शिकत नाही. दिग्दर्शक मीरा नायर यांनी शूटिंगदरम्यान निकिताच्या उपचारासाठी निधी गोळा केला होता. डिस्नीच्या 'क्वीन ऑफ कटवे' या सिनेमात निकिताने ग्लोरियाची भूमिका साकारली होती. या सिनेमात निकिता मुख्य भुमिकेत असलेल्या फियोनाची चांगली मैत्रीण दाखवण्यात आली होती. ही निकितानेच फिओनाला चित्रपटात बुद्धीबळ खेळायला शिकवले होते.
सर्वोत्तम बायॉपीक होता क्वीन ऑफ कटवे
हा चित्रपट मुत्सी यांच्या जीवनावर आधारित होता. मुत्सी ही युगांडामधील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी बुद्धिबळपटू होता. मुत्सीने तीन वेळा महिला कनिष्ठ अजिंक्यपद जिंकले. आंतरराष्ट्रीय चेस ऑलिम्पिकमध्ये मुत्सी यांनी चार वेळा देशाचे प्रतिनिधित्व केले.