मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

नेहा कक्करनं अमिताभ बच्चन यांच्या समोर पूर्ण केलं स्वप्न! शेअर केला खास VIDEO

नेहा कक्करनं अमिताभ बच्चन यांच्या समोर पूर्ण केलं स्वप्न! शेअर केला खास VIDEO

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रॅपर बादशाह 'KBC 13' मध्ये हजेरी लावणार आहेत.नेहा कक्करने   (Neha Kakkar)  आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रॅपर बादशाह 'KBC 13' मध्ये हजेरी लावणार आहेत.नेहा कक्करने (Neha Kakkar) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रॅपर बादशाह 'KBC 13' मध्ये हजेरी लावणार आहेत.नेहा कक्करने (Neha Kakkar) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,16  डिसेंबर-   छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती 13'  (Kaun Banega Crorepati 13)  या वर्षी 23 ऑगस्टपासून सुरू झाला होता. बिग बी अमिताभ बच्चन   (Amitabh Bachchan)   यांचा हा शो आता शेवटच्या आठवड्यात पोहोचला आहे. त्यामुळे या शोमध्ये अनेक मोठमोठे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून बोलावण्यात येत आहेत.दरम्यान बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रॅपर बादशाह 'KBC 13' मध्ये हजेरी लावणार आहेत.नेहा कक्करने   (Neha Kakkar)  आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती अमिताभ यांच्यासाठी हे गाणं गाताना दिसून येत आहे.

नेहा कक्कर अमिताभ बच्चन यांना सांगते की मला तुमच्यासाठी काही तरी म्हणायचं आहे. यावर बिग बी आश्चर्यचकित होऊन म्हणतात, 'माझ्यासाठी'! त्यानंतर नेहा 1976 साली प्रदर्शित झालेल्या 'कभी कभी' या चित्रपटातील आयकॉनिक डायलॉग बोलते, जे या चित्रपटात स्वतः अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहेत. यानंतर, तिने प्रसिद्ध गायक मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेले 'कभी कभी मेरे दिल में खयाल आता है' हे गाणं गायलं.हे गाणं प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिलं आहे. हे लोकप्रिय गाणं नेहाच्या आवाजात ऐकून अमिताभ आठवणींमध्ये हरवलेलेदिसून आले.

अमिताभ बच्चन देखील रॅपर बादशाहसोबत रॅप करताना दिसणार आहेत. दोघांना रॅपिंग करताना पाहून प्रेक्षकांच्या टाळ्या थांबत नसल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हॉट सीटवर बसलेली नेहा कक्करही टाळ्या वाजवताना दिसून येत आहे. हा एपिसोड फारच धमाकेदार होणार असल्याचं प्रोमोवरून लक्षात येत आहे.

(हे वाचा:अशी दिसत होती हरनाज संधू! तुम्ही पाहिलंत का मिस युनिव्हर्सचे Unseen Photos )

'KBC 13' च्या शेवटच्या एपिसोडमध्ये 'चंदीगढ करे आशिकी' चित्रपटाची स्टारकास्ट आयुष्मान खुराना, वाणी कपूर आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर देखील दिसणार आहेत. आयुष्मान खुरानासोबत बिग बी त्यांच्या 'गुलाबो सीताबो' या चित्रपटातील एक सीन रीक्रिएट करणार आहेत. यासोबतच नीना गुप्ता, मनीष पॉल, हरभजन सिंह आणि इरफान पठाण देखील KBC च्या फिनाले वीकमध्ये दिसणार आहेत. 'KBC 13' चा शेवटचा भाग 17 डिसेंबर रोजी प्रसारित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या शोचे एक हजार एपिसोड्स पूर्ण झाले. अमिताभ बच्चन यांनी तिसरा सीझन वगळता इतर सर्व सीझन होस्ट केले आहेत. 'केबीसी 3' शाहरुख खानने होस्ट केला होता.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Entertainment, KBC, Neha kakkar